
Parbhani News : केंद्र शासनाने प्रत्येक शेतकरी खातेदारास एक विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यासाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी अॅग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमांतर्गत आजवर परभणी जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार ६०३ पैकी ३ लाख ४ हजार २८८ (६७.९८ टक्के) शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४३ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे.
एप्रिलपासून कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे अॅग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. अॅग्रीस्टॅकअंतर्गत २८ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील १०० टक्के शेतकरी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
परंतु सर्वसंबंधित विभाग, यंत्रणा यांच्याकडून शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल फारशी जाणीव जागृती न केल्यामुळे शेतकरी नोंदणी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. नोंदणीचा वेग कमी आहे. सर्व्हर डाउन, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आदी कारणांमुळेही नोंदणीस अडचणी येत आहे.
कृषीच्या योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आल्यामुळे नोंदणीस वेग येईल, असे सांगितले जात होते. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत अनुदान लाभ, पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे, पीकविमातसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्व्हेक्षण या कामात
परभणी जिल्हा अॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी स्थिती
तालुका एकूण शेतकरी खातेदार नोंदणी केलेले शेतकरी टक्केवारी
परभणी ७०६९० ५२०८६ ७३.६८
जिंतूर ७१३७० ४९९८५ ७०.०५
सेलू ५२१९६ ३५१०४ ६७.२५
मानवत ३५८९३ २३३०३ ६४.९२
पाथरी ४२६८८ २६६३३ ६२.३९
सोनपेठ २५८२९ २०९०३ ८०.९३
गंगाखेड ५०९०१ ३२३९८ ६३.६५
पालम ४३०८३ २८६५३ ६६.५१
पूर्णा ५४९५३ ३५२१३ ६४.०८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.