Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये ७९ हजार महिलांची नोंदणी

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाभार्थी महिलांची ऑनलाइन ॲपद्वारे नोंदणी सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी झाली, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची नाव नोंदणी सुरु असून ही नोंदणी प्रत्यक्ष गावातच नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका, मदतनीस या करीत आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका व शहरी भागात वार्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षणही झाले आहे. नोंदणी ही ऑफलाईनही करता येते. इंटरनेट सुरळीत नसल्यास ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करुन नंतर माहिती ऑनलाइन अपलोड करता येते.

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७७८ ऑनलाइन तर ६२ हजार ४८८ ऑफलाईन अशा एकूण ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी दिली आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याद्वारे हे अर्ज जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तर समितीकडे अंतिम मंजुरीसाठी येतील.

वर्षाला १८ हजार रुपयांचा लाभ

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहेत. याचाच अर्थ पात्र लाभार्थी महिलेला एका वर्षात १८ हजार रुपये मिळणार आहेत.या योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकाधिक महिलांना घेता यावा यासाठी अनेक अटी शिथिल करत ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. आता २१ ते ६५ वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.

पात्रता निकष

२१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लाभ.

लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक.

लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, पिवळे व केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.

विवाहित,विधवा, घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.

महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रातील जन्मदाखला

सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पनाचा दाखला.

बॅंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

पासपोर्ट साईजचा फोटो

रेशन कार्ड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT