Soybean Procurement Process Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Process : मध्य प्रदेशामध्ये एमएसपीवर सोयाबीन खरेदीसाठी २५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू

Purchase of Soybeans MSP : मध्य प्रदेश सरकारने किमान आधारभूत किंमतीवर सोयाबीन खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी संपूर्ण व्यवस्था आणि सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिल्या आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मध्य प्रदेशमधील सोयाबीन किमान आधारभूत किंमतीवर खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे २५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. तर सोयाबीन खरेदीची संपूर्ण व्यवस्था आणि सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिल्या. तर सोयाबीनची खरेदी २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्य सचिव राणा यांनी दिली आहे.

मध्य प्रदेश सरकार किमान आधारभूत किंमतीवर (MSP) शेतकऱ्यांकडून सोयाबीन पीक खरेदी करणार आहे. मुख्यमंत्री यादव यांच्या सूचनेवरून मुख्य सचिव वीरा राणा यांना आधारभूत किमतीवर किमतीवर सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे खरेदीच्या तारखा व इतर व्यवस्थांची माहिती राणा यांनी दिली. तर सोयाबीनची खरेदी २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत होईल.

सोयाबीन खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आधीच उपाय योजना करण्यात येणार आहेत. तर २५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू केली जाणार आहे. शेतकरी त्यांच्या सोयाबीनची नोंदणी २५ सप्टेंबर ते १५ च्या दरम्यान ई-प्रोक्योरमेंट पोर्टलवर करू शकतात.

याबाबत मुख्यमंत्री यादव यांनी ट्विट करून माहिती दिली. मुख्यमंत्री यादव यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर तारखांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी अधिकाअधिक नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच एमएसपीवर सोयाबीन खरेदीच्या कामाची सर्व व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्याचे म्हटले आहे.

नाफेडसह मार्कफेड करणार खरेदी

मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदाच किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी होणार आहे. यासाठी, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेड (NAFED) नियुक्ती केली आहे. तसेच भारत सरकारची एजन्सी आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघासाठी राज्य सहकारी विपणन महासंघ (MARKFED) द्वारे ते खरेदी केले जाईल. त्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. ही खरेदी ९० दिवसांसाठी केली जाणार असून राज्यात सुमारे ५८ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे.

सोयाबीन खरेदी उद्दिष्ट स्पष्ट नाही

मुख्यमंत्री यादव यांनी ट्विट करून किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी तारखा देखील स्पष्ट केल्या आहेत. पण राज्यातील किती सोयाबीन खरेदी केले जाईल? उद्दिष्ट किती असेल याची माहिती दिलेली नाही. पण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच सोयाबीनची खरेदी केली जाणार असून त्यांचे पैसे तीन दिवसांत थेट बँक खात्यात जमा केले जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT