Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizers : ‘बनावट खते, बियाणे विकणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा’

‘जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची नियमितपणे तपासणी करून येत्या पंधरा दिवसांत त्याचा अहवाल तयार करा.

Team Agrowon

सांगली ः ‘‘जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची नियमितपणे तपासणी करून येत्या पंधरा दिवसांत त्याचा अहवाल तयार करा. तसेच कार्यक्षेत्रातील कृषी सेवा (Krishi Seva Kendra) केंद्राव्यतिरिक्त विनापरवाना कृषी निविष्ठांची (Agriculture Inputs) विक्री करणाऱ्यांवर तक्रार निवारण समिती, भरारी पथकांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’’ असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्ह्यातील खते, बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांच्या गुण नियंत्रण कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांच्यासह ३२ गुण नियंत्रण निरीक्षक उपस्थित होते.

डॉ. दयानिधी म्हणाले, ‘‘सर्व कृषी सेवा केंद्रांची नियमितपणे तपासणी करा. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत अहवाल सादर करा. वारंवार अनियमितता आढळणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करावी. ’’

२५ कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द

सुरेंद्र पाटील यांनी बियाण्याचे ९९ टक्के, खताचे ९१ टक्के व कीटकनाशकांचे ८४ टक्के नमुने काढून विश्‍लेषणासाठी सादर केले आहेत. त्यामध्ये अप्रमाणित आलेल्या नमुन्यांबाबत चालू वर्षी बियाणे २० खते १३ कीटकनाशके १ या प्रमाणे कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण- ८३ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद आदेश दिले आहेत. २५ कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT