Solapur Regional Joint Director Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Regional Joint Director : प्रादेशिक सहसंचालक जागेवर नसल्याने खुर्चीला घातला हार ; ऊसदराचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या ‘रयत’ कडून गांधीगिरी

Sugarcane Rate Issue : सहसंचालक कार्यालयात नसल्याने रयतक्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला हार घालत, तिथे निवेदन ठेवत गांधीगिरी केली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होऊन दोन महिने उलटले, पण अद्यापही बऱ्याच कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. शिवाय उसाचे गाळप होऊनही बिले दिली गेली नाहीत, अशा कारखान्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.२) रयतक्रांती संघटनेचे पदाधिकारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात गेले. पण सहसंचालक कार्यालयात नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला हार घालत, तिथे निवेदन ठेवत गांधीगिरी केली.

ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील, रयतक्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ हे दुपारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात प्रादेशिक सहसंचालक साखर प्रकाश अष्टेकर यांना निवेदन देण्यासाठी आले असता, कार्यालयामध्ये कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून त्यांच्या खुर्चीला हार घालून खुर्चीला निवेदन देण्यात आले. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी यावेळी प्रा.सुहास पाटील यांनी केली.

चालु ऊस गाळप हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटले, पण बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस बिले दिलेली नाहीत, अशा कारखान्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. विलंब झाल्याने १५ टक्के व्याजासहित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले द्यावीत, ऊस तोडणी करताना तोडणी वाहतूकदार, तोडणी मजुर व ड्रायव्हर यांचेकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे,

ती त्वरित थांबवण्यात यावी, उसाला पहिली उचल तीन हजार रुपये प्रति टन द्यावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अन्य पदाधिकारी हनुमंत गिरी, नामदेव पवार, अमोल वेदपाठक, रूपेश वाघ, राहुल पवार आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT