Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Production Cost : शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करा

Sustainable Agriculture : बियाणे आणि रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनते.

Team Agrowon

Latur News : बियाणे आणि रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांचा बियाणे, खतांवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे.

यासाठी कृषी विभागाने शेताच्या बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारणीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देऊन त्यांना घरीच बीज प्रक्रिया, जैविक खते, कीड नियंत्रक सापळे निर्मितीचे प्रशिक्षण द्यावे व शेतीतील उत्पादन खर्च करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध शासकीय विभागांच्या आढावा सभेत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट या वेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत उन्हाळ्यात पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

त्यामुळे ७ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील गायरान जमिनींवर चारा लागवड करण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील किमान पाच एकर गायरान जमिनीवर चारा लागवड करावी. टेकडी, डोंगराळ भागातही चारा लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे ॲड. हेलोंडे पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT