
Nashik News : कृषी क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या तरुणांनी शेतीमध्ये विधायक पद्धतीने काम केले पाहिजे. कृषी योजनांच्या माध्यमातून चांगले उद्योजक घडू शकतात. तसेच शेतकऱ्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन व उत्पन्न कसे वाढवता येईल, याकडे शासन लक्ष देणार आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
मराठा बिझनेस मॅन फोरम नाशिक आवृत्तीच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कोकाटे बोलत होते. या वेळी मराठा बिझनेस मॅन फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण पवार, कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र सावंत, सहसचिव ॲड. माधुरी गायकवाड, माजी सनदी अधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, कृषी उद्योजक श्रीकृष्ण गांगुर्डे आदी उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले, ‘‘युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या बुद्धिवर व कौशल्यावर प्रामाणिकपणे व्यवसाय व उद्योग क्षेत्रात प्रगती करावी. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागातर्फे मेळावे, शिबिर घेऊन गाव खेड्यातील युवकांना शासनाच्या योजनांची माहिती दिली जाईल. शेतीमाल दराची सुरक्षितता मिळण्याबरोबर व फसविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी कायद्यात व नियमात बदल करण्यात येईल. शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी काम करणार आहे.’’
नाशिक चॅप्टरचे जिल्हाध्यक्ष व माजी पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत बनकर यांनी प्रास्तविक केले. त्यांची राज्य कर्यकरिणीवर निवड झाल्याने नवीन अध्यक्ष प्रकाश बनकर यांच्याकडे त्यांनी जबाबदारी सोपविली. या वेळी जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक संदीप पाटील, कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.
शशिकांत जाधव, श्रीरंग हारदे यांनी उद्योजकीय प्रवास मांडला. नितीन ठाकरे यांनी नवउद्योजकांसाठी उपक्रमांची माहिती दिली. मराठा बिजनेस मॅन फोरमचे पदाधिकारी प्रकाश गुंजाळ, श्रीरंग हारदे, गिरीश कोहोक, साहेबराव साळुंखे, सोपान बनकर, शरद आहेर, विलास धूर्जड, विशाल बनकर, शिवम बनकर उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.