Health Center  Agrowon
ॲग्रो विशेष

Health Department Recruitment : आरोग्‍य केंद्रांना रिक्‍त पदांचे ग्रहण

Health Facility : ग्रामीण व दुर्गम भागात रुग्णांना चांगले प्राथमिक उपचार मिळावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसंख्येच्या निकषांनुसार ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत.

Team Agrowon

Raigad News : तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कर्मचार्‌यांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागल्‍याने असून त्‍याचा रुग्‍णसेवेवर परिणाम होत आहे. अपुरी कर्मचारी संख्या त्यात निधीच्या कमतरतेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांनी वेढले गेले आहेत. ग्रामीण जनतेची आरोग्याची मुलभूत गरज भागवणारी ही प्राथमिक आरोग्य केंद्रेच आता आजारी पडली आहेत.

ग्रामीण व दुर्गम भागात रुग्णांना चांगले प्राथमिक उपचार मिळावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसंख्येच्या निकषांनुसार ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. महाड तालुक्यामध्ये बिरवाडी, वरंध, पाचाड, दासगाव, विन्हेरे व चिंभावे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून गाव-खेड्यातील रुग्णांना मोठा आधार आहे. अनेक वर्षांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही सुविधांचा अभाव आणि दुरवस्था कायम आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाड तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम-डोंगराळ आहे. त्‍यामुळे आपत्‍काळात किंवा साथीचे आजार, श्‍वानदंश, सर्पदंशासारख्या घटना घडल्‍यास ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल व्हावे लागते. मात्र येथील सोयी-सुविधांमुळे वेळेत, चांगले उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.

काही वर्षांपासून रिक्त पदांची भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अपुरे मनुष्‍यबळ आहे. परिणामी रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात डॉक्टरांना अडचणी निर्माण होत आहेत.

महाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांमध्ये कनिष्ठ सहायक पदाच्या ५ जागा, औषध निर्माता अधिकारी ३ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५, पुरुष आरोग्य सहायक २, आरोग्य सेवक पुरुष ९, आरोग्य सेवक महिला २२, स्‍त्री परिचर ३, शिपाई ७, समुदाय आरोग्य अधिकारी १५ अशी पदे रिक्त आहेत.

याशिवाय सफाई कर्मचारी, वाहनचालक ही पदेही कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. तालुक्यातील आरोग्य केंद्रामधील वाहनचालकांना सहा महिन्यांपासून कंत्राटदारांकडून वेतन देण्यात आलेले नाही.

जुन्या लोकसंख्येप्रमाणे पदे मंजूर

महाड तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील किमान पाच ते सहा किमीतील गावे-पाडे, लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. शहराजवळ असलेल्या गावांचाही यात समावेश असल्‍याने ग्रामीण भागातील रुग्‍णांना सहा ते १० किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते.

लोकसंख्येनुसार आरोग्‍य केंद्रातील मंजूर पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. मात्र लोकसंख्या वाढली तरी मंजूर पदांची संख्या वाढलेली नाही. शिवाय जी पदे मंजूर आहेत, त्‍यातील जवळपास निम्‍मी पदे रिक्‍त असल्याने रुग्‍णसेवेवर परिणाम होत आहे.

ग्रामीण भागातील जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडणारी नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळ असले पाहिजे. त्यासाठी शासनाने त्वरित भरती करावी.
- सुनील जाधव, ग्रामस्‍थ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

PESA : ‘पेसा’ क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

SCROLL FOR NEXT