Pune News: राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. कमाल तापमानाचा पारा तिशीपार गेल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. कोकणात उन्हाचा चटका वाढल्याने भिरा येथे देशातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ६) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, गुरुवारी (ता. ५) पूर्व राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील भिरा येथे पारा ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे..Weather Update: कोकणातील तापमान ३५ अंशाच्या पुढे.गुरुवारी (ता. ५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकणात कमाल तापमान पस्तिशीपार गेले आहे. राज्यात दिवसभर अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा कायम आहे. आज (ता. ६) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ -उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र ११.० ३१.४पश्चिम महाराष्ट्र १३.० ३२.६मराठवाडा ११.५ ३१.४विदर्भ १२.० ३४.०कोकण १९.४ ३८.०.Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका; कोकणातील तापमान ३५ अंशाच्या पुढे.गुरुवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)शहर कमाल किमानपुणे ३०.५ १४.२अहिल्यानगर ३०.८ १३.५धुळे ३१.० ११.०जळगाव ३१.४ १५.२जेऊर ३१.० १३.०कोल्हापूर ३०.३ १९.२महाबळेश्वर २४.१ १४.५मालेगाव ३०.८ १४.६नाशिक २९.७ १५.६.निफाड २९.६ १२.८सांगली ३१.९ १९.७सातारा ३१.७ १६.०सोलापूर ३२.६ १९.१सांताक्रूझ ३५.० २०.५डहाणू ३५.९ १९.४रत्नागिरी ३५.४ २१.२छत्रपती संभाजीनगर २९.५ १५.२धारशिव ३१.२ १३.५परभणी २९.३ १५.०.परभणी (कृषी) २९.२ ११.५अकोला ३२.६ १५.६अमरावती ३१.२ १६.१भंडारा ३०.० १६.०बुलडाणा ३०.० १६.२ब्रह्मपुरी ३४.० १६.०चंद्रपूर ३१.८ १६.८.गडचिरोली ३०.६ १६.०गोंदिया ३०.८ १४.८नागपूर ३१.० १४.६वर्धा ३१.६ १४.२वाशीम ३१.६ १४.२यवतमाळ ३१.० १२.०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.