Red Onion Rate agrowon
ॲग्रो विशेष

Red Onion Rate : नगरमध्ये लाल कांद्याला विक्रमी दर, प्रति क्विंटल ४८०० रूपये भाव

Onion Market : लाल व गावरान कांद्याची ३६ हजार ४७६ क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक कमी असल्याने विक्रमी ४ हजार ८५० रूपये भाव मिळत आहे.

sandeep Shirguppe

Onion Market News : दिपावलीनिमीत्त बंद झालेल्या बाजारसमित्यांमध्ये शेत मालाची आवक वाढू लागली आहे. नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. दरम्यान नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कालपासून कांद्याची आवक सुरू झाली आहे.

लाल व गावरान कांद्याची ३६ हजार ४७६ क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक कमी असल्याने लाल कांद्याला विक्रमी ४ हजार ८५० रूपये भाव मिळत आहे.

शिल्लक राहिलेला गावरान कांदा बाजारात येत आहे. दरम्यान काल झालेल्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. एक नंबरच्या गावरान कांद्याला ३ हजार ८०० रुपयांपासून ४ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव निघाला.

यानंतर दोन नंबरच्या कांद्याला २ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर निकृष्ट तीन नंबरमध्ये गणला जाणाऱ्या कांद्याला १ हजार ४०० रुपये ते २ हजार ४०० रुपये दर मिळत आहे. तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कांद्याला ७०० रुपयांपासून पुढे विकण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गावरान २१ हजार १७४ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याची १५ हजार ३०२ क्विंटल आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा ३ हजार ९५० ते ४ हजार ८५० रुपये क्विंटलप्रमाणे विकण्यात आला. नंबर दोनच्या कांद्याची २ हजार ७५० रुपये ते ३ हजार ७५० रुपये, तर नंबर तीनचा १ हजार ८०० रुपयांपासून ३ हजार ७५० रुपये, तर नंबर चारचा कांदा १ हजार ते १ हजार ८०० रुपये विकला गेला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी माहिती दिली.

सध्या लाल कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. मात्र, हा कांदा ठराविक शेतकर्‍यांनी पिकविला आहे. यावर्षीचे कांदा भाव लक्षात घेऊन काही शेतकरी अजूनही लाल कांद्याची लागवड करताना दिसत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Israel Dairy Business : दुग्ध व्यवसायात जगात अव्वल इस्राईल

Weather Update: सकाळी हवेत गारवा मात्र दुपारी उन्हाचा चटका कायम

Shivsena UBT : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संतोष सोमवंशी यांची निवड

Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

Supriya Sule Kolhapur : सिंचन घोटाळा प्रकरण! सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT