Onion Market Lasalgaon : १६ दिवसानंतर कांद्याचे लिलाव सुरू, काय मिळत आहे कांद्याला भाव?

Onion Market : दिपावली निमीत्त बंद असलेल्या राज्यातील सर्वात मोठी असलेल्या कांदा बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे.
Onion Market
Onion Marketagrowon
Published on
Updated on

Onion Rate : दिपावली निमीत्त बंद असलेल्या राज्यातील सर्वात मोठी असलेल्या कांदा बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल १२ दिवसांच्या सुट्टीनंतर काल (ता. २०) कांदा लिलावास सुरुवात झाली असून, उन्हाळ कांद्याला कमाल ४ हजार ५४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर लाल कांद्याला ४ हजार १०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

केंद्र सरकारने काद्यावर लावलेल्या निर्यातबंदीच्या मुद्यावरून राज्यातील अनेक कांदा बाजारपेठा बंद होत्या. यामुळे विंचूर बाजारसमितीसोडल्यास सर्वच बाजारपेठा बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कांदा विक्रीस अडचण झाली होती. यामुळे सणासुदीतच शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता.

दरम्यान दिर्घकाळानंतर कांदा लिलाव सुरू झाल्याने लासलगाव कांदा बाजारपेठ फुलली आहे. यंदा पावसाळ्यात पाऊस अत्यल्प बरसला आहे. यामुळे कांद्यासह इतर सर्वच महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. एकीकडे उत्पादनात घट आणि दुसरे शेतमालाला अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

६ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजार समिती बंद करण्यात आली त्या दिवशी लिलाव झाले तेव्हा उन्हाळ कांद्याला कमाल ४ हजार रुपये, तर लाल कांद्याला कमाल ३ हजार ५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यानंतर कालपासून सुरू झालेल्या कांदा लिलावात थोडी तेजी दिसून आली. यामध्ये ५०० ते ६०० रुपयांची भाव वाढल्याचे दिसून आले.

Onion Market
Onion Market : विंचूर उपबाजाराची कांदा लिलावात आघाडी

लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी १ हजार ५११, जास्तीत जास्त ४ हजार ५४५, तर सरासरी ४ हजार रुपये भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी २ हजार, जास्तीत जास्त ४ हजार १०१, सरासरी ३ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

अपेक्षित बाजारभाव नाहीच

शासनाने कांद्यासाठी किमान निर्यातमूल्य ८०० डॉलर प्रतिटन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याची निर्यात मंदावली आहे. तसेच किरकोळ बाजारात केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा २५ रुपये प्रतिकिलो या भावात विकला जात आहे. त्यामुळेही कांदा पुरवठा कमी असताना मागणी असूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com