Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : आळेफाटा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक

Onion Arrival : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र शासनाने मागे घेतल्याने चांगला भाव मिळेल या आशेने आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता. ७) कांद्याच्या ३२ हजार ८२१ पिशव्यांची हंगामातील विक्रमी आवक झाली.

Team Agrowon

Onion Rate News : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र शासनाने मागे घेतल्याने चांगला भाव मिळेल या आशेने आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता. ७) कांद्याच्या ३२ हजार ८२१ पिशव्यांची हंगामातील विक्रमी आवक झाली. कांदा मार्केटमध्ये जागा नसल्यामुळे मार्केटच्या बाहेर हजारो पिशव्या टाकण्यात आल्या होत्या.

एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला २०० रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी दिली. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोठा एक नंबर कांद्यास १० किलोस १८० ते २००, दोन नंबर १६० ते १८०, तीन नंबर गोल्टी कांद्यास १२० ते १५०, चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास १० किलोस ५० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला.

दरम्यान, येथील बाजार समीतीत या आठवड्यात कांद्याची मोठी आवक झालेली असताना देखील बाजारभावात किलोला ५ ते ६ रुपये बाजारभावात वाढ झाली आहे, अशी माहिती संतोष कुऱ्हाडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather News: उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज; काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज

Farmer Compensation Delay: बागायतदारांना हवा मदतनिधी

E Sakal: ‘कॉमस्कोर’ आकडेवारीनुसार सलग ३ महिने डिजिटल क्षेत्रात ‘ई-सकाळ’ नंबर १; वाचकसंख्येत नवा विक्रम

Crop Loan Distribution: रब्बी पीककर्जाचे वितरण अपूर्णच

Akola By Elections: अकोला जिल्ह्यात ७६ ठिकाणी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

SCROLL FOR NEXT