Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Arrival : नगरला कांद्याची विक्रमी १ लाख गोणी आवक

Onion Market : दर प्रतिक्विंटल २४०० रुपयांपर्यंत; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Nagar Onion Market : नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ४) विक्रमी १ लाख १ हजार ६४६ कांदा गोण्यांची आवक झाली. आवक वाढलेली असताना दर कमीच असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे. गुरुवारी प्रतिक्विटंलला २४०० रुपयांपर्यंत व सरासरी १५५० रुपयांचा दर मिळाला.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी लिलाव होतात. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत पुन्हा कांद्याची आवक वाढली आहे.

गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) ८४ हजार ५८६ गोण्यांची, शनिवारी (ता. ३० डिसेंबर) ७० हजार ९४२ गोण्यांची, सोमवारी (ता. १) ७९ हजार ९३७ गोण्यांची तर गुरुवारी (ता. ४) विक्रमी १ लाख १ हजार ६४६ गोण्यांची आवक झाली. निर्यातबंदीमुळे गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर उतरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे दोन हजारांवर आल्याने काही शेतकरी संघटनांनी बाजार समितीसमोर आंदोलन केले होते. गेल्या सोमवारी व गुरुवारी दादा पाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याच्या दराला कासवगतीने वाढ मिळत असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

सध्या बाजारात कांद्याला १ हजार ८०० रुपयांपासून २ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. या महिन्यात कांद्याचे दर तीन हजारांवर जातील, असे जाणकार व्यापाऱ्याने सांगितले.

कांद्याला गुरुवारी (ता. ४) मिळालेला दर
- १ नंबर कांदा - १८०० ते २४००
- २ नंबर कांदा -१२०० ते १८००
- ३ नंबर कांदा - ६०० ते १२००
- ४ नंबर कांदा - २०० ते ६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT