Takari Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Project : ‘ताकारी’चे पाणी पोहोचले तासगाव तालुक्यात

Water Distribution : ताकारी लाभक्षेत्रातील पाणी मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे या वर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारीपासून सुरू केले आहे

Team Agrowon

Sangli News : ताकारी लाभक्षेत्रातील पाणी मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे या वर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारीपासून सुरू केले आहे. कडेगाव आणि खानापूर तालुक्याची तहान भागवून हे पाणी सध्या तासगावातील मतकुणकीजवळून वाहत आहे.

संपूर्ण क्षेत्राला पाणी पोहोचल्याशिवाय ‘ताकारी’ बंद होणार नाही, असा विश्वास कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिला. ताकारी योजनेचे या वर्षीचे पहिले आवर्तन खरीप हंगामात दिले होते. त्यानंतर रब्बी हंगामातील पहिले व या वर्षीचे दुसरे आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले होते.

ते आवर्तन सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली होती. परिणामी ३५ दिवस चालणारे आवर्तन तब्बल ५० दिवस चालवावे लागले होते. या माध्यमातून ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध झाले होते.

मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत (१४४ किलोमीटर) सर्व लाभक्षेत्राला पाणी दिल्यानंतर ते आवर्तन बंद केले होते. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पाणी मागणी वाढली आहे. शिवाय मुख्य कालव्याच्या अंतराचा मोठा टप्पा पार करताना ‘पाटबंधारे’ला कसरत करावी लागत आहे.

यासाठी टप्पा १ व २ वरील ११ पंपांचे पाणी मुख्य कालव्यात सोडले आहे. टप्पा ३ व ४ वरील प्रत्येकी केवळ २ पंप सुरू असून त्याद्वारे पाणी सोनहिरा खोऱ्यासह तडसरपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. ताकारी योजनेचे पाणी वांगीपर्यंत पोहोचवून महिना उलटल्याने परिसरातील पाणी आटू लागले आहे. माळरानाच्या विहिरी सांगळ्यावर आल्या आहेत. ताकारीचे आवर्तन बंद होण्यापूर्वी या भागाला पुन्हा पाणी द्यावे. अन्यथा पुढील आवर्तनापर्यंत जित्राब जिवंत राहणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Horticulture Scheme GR : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

Nagarapalika Result: नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा सत्ताधाऱ्यांना कौल

Rabi Jowar Pest: रब्बी ज्वारीवर मावा किडीचा हल्ला! एकात्मिक उपायांनी वाचवा उत्पादन

Nagarapalika Result: अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत ‘भाजप’च वरचढ

Maharashtra Election: शिंदेंचा निवडणुकीवरील खर्च मोजा, राज्याच्या बजेटच्या किती टक्के?; काँग्रेसचा सवाल

SCROLL FOR NEXT