Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Update : विमा परताव्यासाठी अपात्र तक्रारींची फेरतपासणी

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने अपात्र ठरलेल्या २४ हजार ८५५ तक्रारींच्या फेरतपासणीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Team Agrowon

Amravati News : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने अपात्र ठरलेल्या २४ हजार ८५५ तक्रारींच्या फेरतपासणीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

यामध्ये किती शेतकरी परताव्यासाठी पात्र ठरू शकतात हे महत्त्वाचे असून मुदतीनंतर तक्रार दाखल करणारे ७४२० व १३ हजार १६२ तक्रारी एकापेक्षा अधिक वेळा दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे फेरतपासणी परताव्यासाठी पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

विमा कंपनीने अपात्र ठरविलेले २४ हजार ८५५ शेतकऱ्यांचा तिढा सुटू शकलेला नाही. शेतकऱ्यांकडून कृषी विभागास यावर वारंवार दबाव वाढू लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यावर बैठक झाली. त्यामध्ये फेरतपासणीचे आदेश देण्यात आले.

खरीप हंगामात नुकसान झाल्याने परताव्यासाठी तक्रारी दाखल करणारे २४ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीने अपात्र ठरविल्या आहेत.

त्यांच्या तक्रारींवर फेरसर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने वारंवार विमा कंपनीस पत्रोत्तर केले, बैठकी घेतल्या मात्र प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत फेरतपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

अपात्र ठरविण्यात आलेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या २२,८१० पैकी १२,०९५ तक्रारी एकापेक्षा अधिक वेळा दाखल करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एकाच शेतकऱ्याने एकापेक्षा अधिक वेळा परतावा मागितल्याचे दिसून आले आहे.

२६९९ प्रकरणांत संबंधित भागात नुकसान झालेले नाही. तर, ७१०६ तक्रारी मुदतीनंतर दाखल झाल्या आहेत, असा दावा कंपनीने केला आहे. ३२ शेतकऱ्यांनी विमा काढलेला नसताना दावा केला आहे.

काढणीपश्चात नुकसान झालेले २०४५ तक्रारी कंपनीने अपात्र ठरविल्या असून त्यामध्येही १०६७ तक्रारींमध्ये वारंवारिता आढळली आहे. ४२२ प्रकरणात पीक काढल्यानंतर तक्रारी दाखल झाल्या आहेत. ३१४ तक्रारी मुदतीनंतर दाखल करण्यात आल्या.

या सर्व तक्रारींची फेरतपासणी करण्यात येणार असून वारंवार तक्रारी दाखल झाल्याने त्यातील पहिली तक्रार ठेवून उर्वरित वगळण्यात येणार आहेत. विलंबाने दाखल झालेल्या दोन्ही प्रकारच्या प्रकरणातील ७४२० तक्रारींवर परतावे देता येणार का हे तपासल्या जाणार आहे.

अपात्रतेची स्थिती

एकूण अपात्र - २४,८५५

विलंबाने दाखल तक्रारी- ७४२०

वांरवार दाखल- १३,१६२

विमा काढलेला नाही- ३६

नुकसानच झाले नाही- २७४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT