
Amravati News : खरीप हंगामात पीक विम्याच्या परताव्यापासून १३ हजार ६७२ शेतकरी अद्यापही वंचित आहेत. आगामी खरीप हंगाम डोक्यावर आला असताना सरलेल्या हंगामातील परतावे न मिळाल्याने वंचित शेतकऱ्यांनी कृषी विभागावर आगपाखड केली आहे.
तर या शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू असून, या महिन्याच्या अखेरपर्यंत ते मिळती अशी अपेक्षा कृषी विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, २४ हजार ८५५ शेतकऱ्यांना विमा कंपनीने ठरविले अपात्र ठरविले आहे.
खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये २ लाख १९ हजार ३२१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेत प्रीमियम भरला आहे. हंगामादरम्यान नैसर्गिक आपत्ती आल्यास व त्यामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, अशी आशा त्यांना होती.
हंगामादरम्यान ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी ७२ तासांत पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या १ लाख १५ हजार २२३ व काढणीपश्चात आपत्तीच्या ९२२४ अशा एकूण १ लाख २४ हजार ४४७ तक्रारी विमा कंपनीकडे दाखल झाल्या आहेत. यातील ९९ हजार ५९२ तक्रारी पात्र ठरविण्यात आल्या. तर २४,८५५ तक्रारी अपात्र ठरविण्यात आल्या. यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या २२,८१० व काढणीपश्चातच्या २०४५ तक्रारींचा समावेश आहे.
पात्र ठरविण्यात आलेल्या एकूण तक्रारींमधील ८५ हजार ९२० शेतकऱ्यांना परतावे मिळाले असून, त्यांना एकूण ९१ कोटी ४६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
यातीलच अजून १३ हजार ६७२ विमाधारक शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नाहीत. कृषी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असला, तरी विमा कंपनीची भूमिका मात्र अडचणीची जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे आगामी खरीप हंगाम डोक्यावर आला आहे.
तालुकानिहाय वंचित शेतकरी संख्या
अचलपूर ३१४, अमरावती ६७२, अंजनगावसुर्जी २९०, भातकुली ८९६, चांदूर रेल्वे ७८८, चांदूर बाजार १,०००, चिखलदरा ३५, दर्यापूर ४२४, धामणगावरेल्वे २४४, धारणी ६८, मोर्शी १५१०, नांदगाव खंडेश्वर ५८५२, तिवसा १४४१, वरूड १३८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.