Farmers Loan Scheme News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सेंट्रल बँकेने शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा वाढवली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा १ लाख ६० रुपये इतकी होती. आज शुक्रवारी (ता.०६) पाच वर्षांनंतर या योजनेत बदल करत असे पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
शासकीय ओळख आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी इतर कागदपत्रे शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत. भारतीय रिझर्व बँकेने छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थीक उन्नतीसाठी घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ घेता येणार आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोलॅटरल कर्ज?
खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकांकडून कोलॅटरल कर्ज घेतले जाऊ शकते. यासाठी १०.५० टक्क्यांहून अधिक व्याजदर आहे. कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त कर्ज दिले जाते.
११ वेळा रेपो दरात कोणताही बदल नाही
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग ११ व्यांदा पतधोरणात कोणताही बदल केला नाही. तो ६.५ टक्क्यांवर ठेवला. मात्र, अर्थव्यवस्थेतील तरलता वाढवण्याच्या उद्देशाने बँकेने सीआरआर ४.५ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आणला. या निर्णयामुळे बँकांना १.१६ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे.
कोणताही दिलासा नाही
सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरासाठी, वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेल्यांना यावेळीही दिलासा मिळालेला नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.