Milk Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध दरप्रश्‍नी ‘रयत’कडून शासन आदेशाची होळी

Milk Rate Issue : गाईच्या दूध खरेदी दराबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. तसेच दुधाला सरकारनेच प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याचे जाहीर करूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही.

Team Agrowon

Solapur News : गाईच्या दूध खरेदी दराबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. तसेच दुधाला सरकारनेच प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याचे जाहीर करूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही.

त्यामुळे रयत क्रांती संघटनेकडून पंढरपूर तालुक्यातील रांझणी व मुढेंवाढी येथे शुक्रवारी (ता. २४) शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

‘‘राज्य सरकारने जून महिन्यात गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर दिला. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण रिव्हर्सच्या नावाखाली हा दर पुन्हा खाली आला. पण खासगी दूध संघाकडून नियमानुसार दर देण्याऐवजी त्यातही लूट सुरु केली.

आता तर दूध दर २७ रुपयांवर आणला आहे. सरकारही या खासगी संघवाल्यांना पाठीशी घालत आहे. या निषेधार्थ आम्ही काहीही उपयोग नसणाऱ्या या आदेशाची होळी केली,’’ असे भोसले या वेळी म्हणाले. ‘‘यावर सरकारने विचार करावा, अन्यथा मुंबई व पुण्याकडे जाणारे दुधाचे टँकर अडवू,’’ असा इशाराही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT