Milk Rate : शासनाच्या आदेशाची होळी ! दूध दरावरून रयत क्रांती संघटना आक्रमक

Milk Procurement Rate : राज्यातील दूग्ध उत्पादकांना जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दरपत्रकाप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सांगलीत शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.
sadabhau khot Protest
sadabhau khot ProtestAgrowon
Published on
Updated on

Satara News : राज्यातील दूग्ध उत्पादकांना जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दरपत्रकाप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्यावतीने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील रेठरे धरण येथील दूध संकलन केंद्रांवर शासन आदेशाची होळी करण्यात आली.

sadabhau khot Protest
Milk Rate : सरकार अन् दूध उत्पादकांची बैठक निष्फळ, शासनाच्या परिपत्रकाची होळी

राज्यातील दूग्ध उत्पादकांना जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दरपत्रकाप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आले. या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध दर परिपत्रकाची होळी करण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार आज माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रेठरेधरण ता. वाळवा जि. सांगली येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने दूध संकलन केंद्रांवर शासन आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी डी.के. पाटील, अमोल पाटील, सरपंच संदीप खोत, प्रशांत पाटील, सुहास पाटील, महादेव खोत, योगेश शिंगाडे व शेतकरी उपस्थित होते..

राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com