Rayat worker Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : : दूध दरासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक ; विखे-पाटलांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

Sadabhau Khot : दूध दराच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिक घेतली आहे. सरकारच्यावतीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

Swapnil Shinde

Dairy farmer Protest : राज्यातील दूधला कमी दर मिळत असल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांनी सोलापूरात पंढरपूर ते विजापूर रोडवर एकलासपूर येथे रस्ता रोको करण्यात आला. सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

दूध दराबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास दिवाळीच्या पाडव्या दिवशी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.

दूध दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व दूध सहकारी आणि खासगी संस्थांची बैठक घेतली. या बैठकीत दूध खरेदी दर हा राज्यात एकसारखा असावा आणि तो ३५ रुपये लिटर देण्यात यावा अशी या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी राज्य सरकार, दूध संघ, उत्पादक शेतकरी यांच्या समिती स्थापन केल्याची घोषणा विखे-पाटील यांनी केली.

या समितीचा निर्णय न झाल्याने राज्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर ३४ रूपये असताना दूध संघांनी दरात कपात करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना २७ ते २८ रुपये दर मिळत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या निषेधार्थ रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरली आहे. दिवाळी पूर्वी सरकारने दुध दरात वाढ करावी अन्यथा दिवाळी पाडव्याच्या दिवशी मंत्री विखे-पाटील यांच्या घरासमोर खर्डा भाकरी आंदोलन केले जाईल; असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT