Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : राज्याला अखेर मिळाला पूर्णवेळ कृषी आयुक्त

Agriculture Commissioner : ज्याला अखेर पूर्णवेळ कृषी आयुक्त मिळाला आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची आता कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्याला अखेर पूर्णवेळ कृषी आयुक्त मिळाला आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची आता कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी खात्यातील सोनेरी टोळीकडून कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी योजनेच्या नावाखाली ३०० कोटींच्या कृषी निविष्ठा खरेदीला डॉ. गेडाम यांनी विरोध केला होता. त्यामुळे ते कृषी खात्यातील भानगडबाजांना नकोसे झाले होते.

तसेच, आयुक्तपदी राहण्यास डॉ. गेडामदेखील इच्छुक नव्हते. या गोंधळातच ३१ मे रोजी डॉ. गेडाम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस राज्याला कृषी आयुक्त नव्हता.

आयुक्तांना हटवून ऐन खरिपात कृषी विभाग वाऱ्यावर सोडण्यात आल्याची टीका झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार दिला गेला होता.

आयुक्तपदावर श्री. भागडे यांनाच कायम ठेवण्याचे प्रयत्न काही अधिकारी करीत होते. दुसऱ्या बाजूला, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विश्‍वासातील अधिकारी म्हणून श्री. बिनवडे यांच्या नावाला पसंती दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही पसंती मान्य करीत श्री. बिनवडे यांच्या नियुक्तीच्या फाइलवर एक आठवड्यापूर्वीच स्वाक्षरी केली होती.

परंतु मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र बाहेर येत नव्हते. त्यामुळे पुन्हा आयुक्तालयालयात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी (ता.२५) श्री. बिनवडे यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले.

(ॲग्रो विशेष)

नवे आयुक्त व कृषिमंत्री एकाच जिल्ह्यातील म्हणजे बीड येथील आहेत. पाटोदा तालुक्यातील शेतकरी कुटुंबात राहून शिक्षण घेत असताना श्री. बिनवडे छत्रपती संभाजीनगर विभागात हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होते.

गुणवत्ता यादीत दहावीला ते नववे; तर बारावीला चौथे आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी २००८ मध्ये संगणकाशास्त्रात अभियांत्रिकी पदवी (बीई) संपादन केली.

विशेष म्हणजे टीसीएस, अॅमडॉक्स या खासगी सॉफ्टवेअर कंपनीत त्यांनी काही वर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपरचे कामही केले. २०१२ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र तुकडीतून ते सनदी अधिकारी झाले. नंदुरबार, नगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

श्री. बिनवडे यांना मराठवाडा व विदर्भातील शेती तसेच शेतीसंलग्न समस्यांची माहिती आहे. मितभाषी व हुशार अधिकारी म्हणून ते प्रशासनात परिचित आहेत. नियुक्ती होताच खरीप हंगामाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित राहण्यासाठी मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले.

तर काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयुक्तपदाची सूत्रे ते आज (ता.२६) स्वीकारणार आहेत. श्री. बिनवडे यांच्या नियुक्तीची माहिती मिळताच कृषी संचालक विनयकुमार आवटे व कृषी सहसंचालक सुनील बोरकर यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT