Agriculture Department : विस्तार संचालकपद आवटेंकडे; किरन्नळी यांच्याकडे ‘आत्मा’

Agriculture Director's Post : कृषी आयुक्तालयामधील संचालकांच्या रिक्त झालेल्या जागांचे अतिरिक्त कार्यभार अखेर सेवाज्येष्ठ सहसंचालकांना देण्यात आले आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : कृषी आयुक्तालयामधील संचालकांच्या रिक्त झालेल्या जागांचे अतिरिक्त कार्यभार अखेर सेवाज्येष्ठ सहसंचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या विस्तार व प्रशिक्षण संचालकपदी विनयकुमार आवटे यांची; तर ‘आत्मा’च्या संचालकपदी अशोक किरन्नळी यांची वर्णी लागली आहे.

तत्कालीन विस्तार संचालक दिलीप झेंडे व ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे अलीकडेच निवृत्त झाले होते. या रिक्त जागांचे अतिरिक्त पदभार सेवाज्येष्ठ सहसंचालकांना दिले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, विस्तार विभागाचे अतिरिक्त काम गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांना, तर फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांना आत्माचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यामुळे सेवाज्येष्ठ सहसंचालकांना डावलण्यात आल्याची भावना अधिकारी वर्गात होती.

Agriculture Department
Agriculture Department : ज्यांच्या जीवावर पगार घेतो त्यांची जाणीव ठेवलीच पाहिजे

कृषी मंत्रालयातील अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी बुधवारी (ता. १२) अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत नवे आदेश जारी केले. सध्याचे विस्तार सहसंचालक श्री. आवटे व फलोत्पादन सहसंचालक श्री. किरन्नळी यांनी पुढील आदेश येईपर्यंत संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

श्री. किरन्नळी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषिशास्त्राचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. १९९० मध्ये त्यांची वर्ग एक श्रेणीत निवड झाल्यानंतर ते सिंधुदुर्गचे कृषी विकास अधिकारीपदी रुजू झाले. कोल्हापूर, यवतमाळ येथे विभागीय मृद संधारण अधिकारी, धाराशिव व सोलापूरला ‘एसएओ’पद सांभाळून ते २०२१ पासून आयुक्तालयात फलोत्पादन विभाग सांभाळू लागले.

राज्याच्या सेंद्रिय शेतीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. धाराशिव जिल्ह्यात नियंत्रित शेतीच्या माध्यमातून जरबेरा लागवडीसाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. २०१२ मधील दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात ९५० शेततळ्यांचे खोदाई अभियान राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Agriculture Department
Agriculture Department : बाळापूर तालुक्यात कृषी विभागात ५० टक्के जागा रिक्त

कृषी विस्तारात आवड असलेले श्री. आवटे हे पुणे कृषी महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्यांनी वनस्पती विकृतीशास्त्राचे एक वर्षाचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे १९९१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. १९९३ ची नागपाडा दंगल नियंत्रणात त्यांचा वाटा होता.

केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत सेंट्रल एक्ससाइज इन्स्पेक्टरपदीदेखील ते निवडले गेले होते. मात्र, या सेवा सोडून ते कृषी सेवा वर्ग एकमधून उपसंचालकपदी रूजू झाले. ठाणे जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी, कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, संपादक शेतकरी मासिकाचे संपादक तसेच राज्याच्या मुख्य सांखिकपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या सांभाळली आहे.

शैक्षणिक वाटचालीत क्रीडाविषयक कामगिरीत अनेक पदके आणि कृषी सेवेत विविध पारितोषिके मिळवणाऱ्या श्री. आवटे यांना राज्य शासनाने पहिला कृषी सेवारत्न पुरस्कार दिला आहे. त्यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान पीकविमा तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्याला राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com