Ration Card Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Card : रेशनकार्डधारकांना आता मिळणार ‘ई-शिधापत्रिका’

Ration Card Management : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘क्यूआर’ कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Ration card jalgaon News : पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेच्या एपीएल शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त शिधापत्रिकाधारक, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना आता ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा निशुल्क उपलब्ध होणार आहे.

अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदारास संकेतस्थळावरून ई-शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘क्यूआर’ कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दर निश्चित

अंत्योदय अन्न योजनेसाठी २५ रुपये, प्राधान्य कुटुंब योजनेसाठी ५० रुपये, एपीएल शेतकऱ्यांसाठी ५० रुपये, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त व एपीएल शेतकरीव्यतिरिक्त ५० रुपये व शुभ्र शिधापत्रिका शंभर रुपये, असे दर यापूर्वी निश्चित केले होते. मात्र, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक गरीब व गरजू कुटुंबातील आहेत.

त्यामुळे या योजनांच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ऑनलाइन ई-शिधापत्रिका सुविधेसाठी सेवाशुल्क न आकारता मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT