Ration card e KYC Agrowon
ॲग्रो विशेष

Ration card e KYC : रेशनकार्ड ई-केवायसीची ३१ ऑक्‍टोबर मुदत, १ नोव्हेंबरपासून धान्य बंद होणार?

E KYC Ration Card : शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्‍यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्‍यात आली आहे.

sandeep Shirguppe

National Food Security Scheme : राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेतंर्गत स्‍वतातील धान्‍य मिळविण्‍यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’चे बंधन घा‍तले आहे. अन्‍न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्‍यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्‍यात आली आहे.

जर शिधापत्रिकाधारकांने ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्‍यांना रेशनधान्‍य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्‍या शिधापत्रिकादेखील रद्द केल्‍या जाणार आहेत.

शिधापत्रिकेत नावे असलेल्‍या प्रत्‍येक लाभार्थ्‍यांने आपल्‍या क्षेत्रातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानात जाऊन तेथे उपलब्‍ध करून दिलेल्‍या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्‍ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्‍यायचा आहे. अवघ्‍या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्‍यावरच येत्‍या काळात लाभार्थ्‍यांच्‍या नावाने धान्‍य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

हातकणंगले तालुक्याचे पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्‍येक धान्‍य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया नि:शुल्‍क सुरू आहे. स्‍वस्‍त धान्‍य दुकानातील ई-पॉस मशीनव्‍दारे प्रत्‍येक शिधापत्रिकाधारकांनी कुंटुंबातील सदस्‍यांची केवायसी करून घ्‍यावी. आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्‍यांचे रेशन बंद होणार असल्याची माहिती काळगे यांनी दिली.

पारदर्शकतेचा उद्देश

स्थलांतरित कुटुंबांनादेखील ते वास्‍तव्‍य करत असलेल्‍या क्षेत्रातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपटेड करण्‍यामागे धान्‍य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्‍याचे सांगण्‍यात आले.

१ नोव्हेंबरपासून धान्य बंद होण्याची शक्यता

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेतंर्गत गरीब गरजूंना रेशनधान्‍य पुरवठा केला जातो. त्‍या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली. योजनेतील बनावट लाभार्थ्‍यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी ३१ ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्‍यांचे रेशनधान्‍य तसेच रेशनकार्ड १ नोव्‍हेंबरपासून बंद होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Production : भात, भुईमुगाच्या उत्पादनात आजरा तालुक्यात घट

Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Solapur Assembly Constituency : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी ३८५ अर्ज दाखल

Sugar and Ethanol : साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलची खरेदी किंमत वाढवू; केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशीचे विस्माला आश्वासन

Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT