Loan Distribution: धुळे जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, स्वयंसहाय्यता गट, तसेच विविध समाजघटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिकाधिक कर्जवाटप करावे. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळण्यात अनावश्यक अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेऊन विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. .जिल्ह्यास २०२६- २०२७ मध्ये खरीप पीक कर्ज वितरणाचे ८९६.५२ कोटींचे उद्दिष्ट निश्चित झाले. पैकी ३१ जुलैअखेर ५१४ कोटी ३८ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित झाले असून ही ५७.३८ टक्के उद्दिष्टपूर्ती असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय बॅकर्सच्या सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी विसपुते यांच्या अध्यक्षतेत झाली. .Nashik Loan Waiver : नाशिकमध्ये कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग.जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जयेश बळकटे, उमेदचे प्रकल्प संचालक राजन पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते..५७ टक्के वितरणजिल्ह्यासाठी २०२६- २०२७ मध्ये खरीप पीक कर्ज वितरणाचे ८९६.५२ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पैकी ३१ जुलैअखेर ५१४ कोटी ३८ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले असून ही ५७.३८ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी खरीप पीक कर्जाचे २३४ कोटी ८७ लाखांचे उद्दिष्ट असून, २०५ कोटी ७३ लाखांचे वितरण करण्यात आले आहे. ही कामगिरी ८७.६० टक्के आहे..Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल.महाराष्ट्र ग्रामीण बँकेनेही ७८.३० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. काही बँकांची कामगिरी चांगली असून, उर्वरित बँकांनीही कर्जवाटपाला अधिक गती देऊन खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे. नवीन पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच पात्र कर्ज खात्यांच्या नूतनीकरणालाही प्राधान्य द्यावे. पीक कर्ज वितरणात मागे असलेल्या बँकांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत कर्जपुरवठा पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले..योजनांची उद्दिष्टपूर्तीबँकांच्या शाखांमध्ये विविध कर्ज योजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि कर्ज मंजुरी प्रक्रियेची माहिती नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने सूचना फलकावर प्रदर्शित करावी. कर्ज प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित अर्जदारांना त्याची स्पष्ट माहिती द्यावी. पात्र प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत. बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करून योजनांची उद्दिष्टपूर्ती करावी, असेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.