Crop Insurance Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : वाढीव पीकविम्यासाठी करकट्टा येथे ‘रास्ता रोको’

Crop Insurance Scheme : पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात घट होणार आहे.

Team Agrowon

Latur News : पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात घट होणार आहे. यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना पंचेवीस टक्के वाढीव भरपाई देण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, जिल्ह्याची पिकविमा कंपनी असलेल्या एसबीआय जनरल इन्सुरन्स कंपनीने ही अधिसूचना फेटाळून लावत आगाऊ भरपाई देण्यास नकार दिला आहे.

याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांना आगाऊ पीकविमा द्यावा, या मागणीसाठी लातूर ते टेंभूर्णी रस्त्यावरील करकट्टा (ता. लातूर) येथे शुक्रवारी (ता. १३) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळी रस्त्यावरील वाहतुक बराचकाळ ठप्प झाली होती.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी विमा कंपनीसह सरकारवर जोरदार टिका करत सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याची भावना व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी सरकार व कंपनीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तलाठी रणजीत पानगावकर यांना देण्यात आले.

आंदोलनासाठी पुढाकार घेतलेल्या चारही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. आंदोलनात नाथसिंह देशमुख, संजय शेटे, सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, अॅड. विजयकुमार जाधव, धर्मराज पाटील, दीपक इंगळे, महारुद्र चौंडे, मदन काळे, भक्तावर बागवान, बालाजी कदम, अभयसिंह नाडे, आकाश कणसे, विनायक शिंदे, श्रीकांत मगर, परमेश्वर पवार, पम्पू शिंदे, बालाजी पवार, प्रमोद जाधव, अनिल शिंदे, यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Punjab Flood Funds: पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मदतनिधीवरुन कलगीतुरा

Cotton Ginning Factory: जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा

Onion Farmers: नाफेड, एनसीसीएफकडील कांदा देशात विकल्यास ते ट्रक पेटवू

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठी बार्शीत प्रशासनाची दडपशाही

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

SCROLL FOR NEXT