Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ

Team Agrowon

Pune News : गेल्या २० ते २५ दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. खडकवासला, वरसगाव, टेमघर, पवना, चासकमान, वडिवळे, वीर, भाटघर, मुळशी, वारणा, कोयना, राधानगरी, गोसी खुर्द, इटियाडोह, कामठीखैरी आदी धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण कायम आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम, तर कोकणात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत शिरगाव घाटमाथ्यावर १७२ मिलिमीटर पाऊस झाला.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. ताम्हिणी घाटमाथ्यावर १६०, कोयना १५८, दावडी १४० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोकणातील गडनदी, जगबुडी, वशिष्टी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मोडकसागर, विहार, तानसा, तुलसी, अर्जुना ही धरणे शंभर टक्के, तर मध्य वैतरणा, भातसा, मोराबे, हेटवणे, तिलारी, गडनदी, धामणी ही धरणे ८० टक्केहून अधिक भरली आहेत.

पश्‍चिम, मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. नाशिकमधील पेठ मंडलात ५१, जागमोडी ३०, कोहोर, निफाड ५१, दहादेवाडी ४५, पुणे जिल्ह्यातील कार्ला ४०, लोणावळा ४३, वेल्हा ७१, साताऱ्यातील बामणोली ३९, तापोळा ६५, लामज ९९ कोल्हापुरातील बाजार ४०, मलकापूर ५३, गगनबावडा ५९, साळवण ५२, कडगाव ६१, चंदगड, नारंगवाडी, हेरे ४८ मिलिमीटर पाऊस झाला.

प्रामुख्याने धरणक्षेत्रात जोरदार सरी कोसळत आहे. धरणांतून विसर्ग सोडल्याने मुठा, पवना, आरळा, भीमा, इंद्रायणी, कानंदी-नीरा, कुकडी, मीना, कृष्णा, उरमोडी, कोयना, वारणा, पंचगंगा, तुळशी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा या या नद्या भरून वाहत आहेत. नगर, सोलापूर, सांगली, खानदेशात पावसाची उघडीप असून अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत.

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नांदेडमधील लोहा, सोनखेड मंडलात ९९ मिलिमीटर, तर माळाकोळी ६९, कंधार, फुलवाल ६७, गोळेगाव ६४ कलंबर ६३ मिलिमीटर पाऊस पडला. परभणीतील पालम येथे ६६, बनवस ६९, पेठशिवणी ६६, रावराजूर ४७, गंगाखेड ४४, महातपुरी ४० मिलिमीटर पाऊस झाला.

विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील मंडलनिहाय पाऊस (५० मिमीच्या पुढे) :

कोकण : नयाहडी ७७, बिरवडी ७१, मार्गताम्हाणे ५३, रामपूर ५८, आंगवली ५२, कोंडगाव ६३, देवळे ६४, सौंदळ ९६, ओणी ६६, पाचल ६१, लांजा ६६, विलवडे ६६, पाटगाव ५१, पेंडूर ६३, वेंगुर्ला ७८, म्हापण ६८, वेतोरे ८८, कणकवली ६१, फोंडा ७४, सांगवे ५९, वागदे ६१, कुडाळ ५३, कसाल ६०, वालावल ६८.

मराठवाडा : शेवडी ५३, बरबडा ५३.

विदर्भ : जाम ५९, खांढळी ५८, मंडगाव ५९, पारशिवणी, नावेगाव ५७, भिवापूर ६०, देवरी ५५, चिंचगड ६१, सिंदबीरी ९३, नवेगावबांध ६६, सौदाद ७५, सडक अर्जुनी ८०, चिमूर ५८, भिसी ५६, नेरी५८, गांभूळघाट ५८, नागभिड ५०, सावळी, पाथरी, विहाड ६१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

Marathwada Rain : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

Cotton Production : कापूस परिषदेत घटते क्षेत्र, उत्पादकतेवर चिंता व्यक्त

PDKV Shiwarferi : शिवारफेरीत गर्दीने प्रक्षेत्र फुलले

Maize Crop Issue : मक्यावर ‘सुकवा’; कणसात दाणेही अपरिपक्व

SCROLL FOR NEXT