Satara Weather Forecast : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागच्या २४ तासात धुवाधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा सकाळी आठ वाजता ८५.८१ टीएमसी झाला होता. सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेला ४० हजार क्यूसेक विसर्ग गेल्या तीन दिवसापासून कायम ठेवण्यात आला आहे.
त्याचबरोबर पायथा विज गृहातुन २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कोयना नदीपात्रात ४२ हजार १०० क्युकेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तो विसर्ग तीन दिवसापासून स्थिर ठेवण्यात आला आहे. दरम्यान कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पावसाचा जोर असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. पावसाचा जोर दिवसा कमी होत आहे. रात्रीच्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. आज गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात ८५.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणात ४५ हजार १६८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला ८८, नवजा १२४ तर महाबळेश्वरला ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून मंगळवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आलेल्या पाण्यात काल बुधवारी वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन दिवसापासुन ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पुरस्थितीत निर्माण होवू नये यासाठी स्थीर ठेवण्यात आला आहे. मात्र धरणातील पाण्याची आवक वाढल्यास धरणातून अजूनही विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाने कळवले आहे.
पुरबाधीत होणाऱ्या हेळवाकची अधिकाऱ्यांकडून पाहणी
कोयना धरणातून पाणी सोडल्यावर पुरबाधीत होणाऱ्या पाटण तालुक्यातील हेळवाकला कोयना धरण व्यवस्थापनचे अधिकारी पोतदार, जाधव, राणे यांनी भेट देवून पाहणी केली. हेळवाक गावचे मंडल अधिकारी संजय जंगम, निलेश भाग्यवंत, प्रविण सुर्यवंशी, पोलिस पाटील विरेंद्र कदम, सरपंच गजानन कदम, उपसरपंच राहूल कडोले व ग्रामस्थ उपस्थित होते. नदीकाठचे व्यवसायीक, ग्रामस्थांना व घरमालक यांना सुचना देण्यात आल्या. यावेळी हेळवाकचे सरपंच यांनी धरणाचे पाणी सोडल्यानंतर प्रथम हेळवाक गावाला कसा धोका निर्माण होतो याची माहिती दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.