Bhandardara Water Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Rain News : भंडारदऱ्यातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ

Bhandardara Water Dam : नगर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी अकोल्यातील पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

Team Agrowon

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी अकोल्यातील पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

सोमवार (ता. ३) सकाळपर्यंत धरणात ५४.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणात ३३.२५ टक्के, तर निळवंडे धरणात २२ टक्के पाणीसाठा आहे.

नगर जिल्ह्यात यंदा उशिराने पाऊस सुरू झाला. अजूनही अनेक भागात जोरदार पाऊस नाही. दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हात आखडता घेतल्याने सुरू झालेल्या पेरण्या पुन्हा थांबल्या आहेत. मात्र अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील रतनवाडी, घाटघर, पांजरे, वाकी, भंडारदरा यांसह रतनगड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

सोमवारी (ता. ३) सकाळ आठ वाजेपर्यंत घाटघरला १२७ मिलिमीटर, रतनवाडीला १२० मिलिमीटर, वाकीला ५९ मिलिमीटर, पांजरे येथे ११५ मिलिमीटर, भंडारदरा येथे ७७ मिलिमीटर व निळवंडे धरण परिसरात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणलोटात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू आहे. आतापर्यंत भंडारदरा धरणात सव्वा टीएमसी पाणी आले आहे.

निळवंडेतही सव्वा टीएमसी पाणी आले आहे. मुळात अजून पाण्याची आवक सुरू झाली नसली तरी कोतुळजवळ मुळा नदीतून २४४१ क्युसेकने पाणी वाहत आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात ३३.२५ टक्के पाणी आहे.

नगर जिल्ह्यातील अन्य धरणांत मात्र पाण्याची आवक झालेली नाही. मात्र गतवर्षी चांगल्या पावसामुळे यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. सध्या धरणात आधीचाच समाधानकारक पाणीसाठा दिसत असला तरी असाच पाऊस लांबत राहिला तर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

धरणातील पाणीसाठा (टक्के)

भंडारदरा ५४.७०, निळवंडे २१.९७, मुळा ३३.२५, आढळा ५०.६६, भोजापूर ११.३६, पिंपळगाव जोगा ०, येडगाव ३५.१०, वडज ७.८८, माणिकडोह ७.९६, डिंभे ६.३८, मांडओहळ १३.५६, घाटशीळ पारगाव ११.४४, विसापूर १५.२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT