BJP Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Assembly Constituency : अकोल्यात भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर

Maharashtra Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत अकोला पूर्व मतदार संघात रणधीर सावरकर यांना संधी देण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत अकोला पूर्व मतदार संघात रणधीर सावरकर यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अकोट, मूर्तिजापूर, अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारांची नावे सध्या मागे ठेवण्यात आल्याने क्लायमॅक्स वाढला आहे. अकोटमध्ये उमेदवार बदलणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यात भाजपचे पाच विधानसभा मतदार संघांत गेल्या निवडणुकीत विजय झाला होता. सातत्याने भाजप जिल्ह्यावर प्रभाव ठेवून आहे. रविवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत विद्यमान आमदार सावरकर यांचे नाव घोषित केल्या गेले.

परंतु अकोट व मूर्तिजापूर या लक्षवेधी मतदार संघात विद्यमान आमदार असलेले प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांची नावे जाहीर झालेली नाहीत. तर गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिममध्ये आता कोणाला उमेदवारी दिली जाते हे गुपित आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने उभेच्छूकांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच हे नाव शेवटच्या टप्प्यात जाहीर केल्या जाऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

बुलडाण्यात विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास

भाजपने खामगाव, चिखली, जळगाव जामोद या तीन मतदार संघांमध्ये विद्यमान आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, डॉ. संजय कुटे यांची नावे जाहीर केली. मलकापूर मतदार संघात भाजप कोणाला उमेदवारी देते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजपचा हा मतदार संघ गेल्यावेळी काँग्रेसचे आ. राजेश एकडे यांनी जिंकला होता. त्यामुळे या मतदार संघात आता माजी आ. चैनसुख संचेती यांना भाजप उमेदवारी देतो की दुसरे नाव घोषित करतो हे आता यापुढील काळात येणाऱ्या यादीतूनच स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT