Ashok Chavhan and Milind Deora Agrowon
ॲग्रो विशेष

Rajyasabha Candidate : अशोक चव्हाण, देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Team Agrowon

Mumbai News : राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा गुरुवारी (ता. १५) शेवटचा दिवस असला तरी बुधवारीच (ता. १४) भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि काँग्रेस या पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली.

अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाण यांना भाजपने, तर शिवसेनेने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सायंकाळी उशिरा वरिष्ठ नेेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली असून, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी (ता. १५) शेवटची मुदत आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १३) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांना राज्यसभा उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांना प्रथम क्रमांकाची उमेदवारी दिली आहे. चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा याआधीच दिला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने मेधा कुलकर्णी यांना सक्तीची राजकीय रजा घ्यावी लागली होती. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकांत त्यांचे नाव चर्चेला येत होते.

या वेळी भाजपने त्यांना थेट राज्यसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदार संघ पाटील यांच्यासाठी खुला झाला असल्याचेही बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांना राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल, असे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे त्यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याआधी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अनपेक्षितरीत्या पराभव पत्करावा लागलेल्या चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने संधी दिली असून, त्यांच्यासाठी आता पक्षाने कंबर कसली आहे. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे अन्य काही उमेदवार पक्ष सोडतील अशा वदंता आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने आमदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. १४) सायंकाळी उशिरा वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षफुटीच्या पार्श्‍वभूमीवर अंतर्गत असंतोषाला तोंड देण्यासाठी पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT