Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : राजू शेट्टींचा सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अधिवेशनामध्ये कांद्याच्या दरावरून जोरदार घमासान सुरू आहे. या प्रश्‍नी सत्ताधारी व विरोधकात संघर्ष सुरू आहे.

Team Agrowon

Raju Shetti News कोल्हापूर : राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetakri Sanghatana) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी समाज माध्यमातून केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अधिवेशनामध्ये कांद्याच्या दरावरून जोरदार घमासान सुरू आहे. या प्रश्‍नी सत्ताधारी व विरोधकात संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. शेट्टी यांनी समाज माध्यमातून टीका केली आहे.

श्री. शेट्टी म्हणतात, की गेल्या दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहून समाधान वाटले.

पण हेच विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा भूमी अधिग्रहण दोन टप्प्यातील एफआरपी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारी निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधिमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगले होते?

तेव्हा आताच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असताना या प्रश्‍नांवर सभागृहात गोंधळ घातला आणि सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू

Rain Alert Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’मुळे वित्तीय तूट नाही

Onion Rate Crash : कांद्याचे ट्रॅक्टर थेट कार्यालयासमोर आणून निषेध

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

SCROLL FOR NEXT