Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : राजू शेट्टी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आजपासून राज्य दौऱ्यावर

Milk Powder Import : दूध पावडर आयाती विरोधात राज्यभर आंदोलन करून केंद्राला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

sandeep Shirguppe

Maharashtra Tour Raju Shetti : शेतीमालाच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळेच सोयाबीन, ऊस, कापूस, दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी यासाठी एक जुलैपासून राज्यभर दौरा आणि आंदोलन करणार आहे.

दूध पावडर आयातीचा निर्णय दूध उत्पादक आणि दूध संस्थांना संकटात नेणारा आहे. या विरोधात राज्यभर आंदोलन करून केंद्राला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आजपासून (ता.०१) वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास पुसद (जि. यवतमाळ) येथून सुरुवात होणार आहे. राज्यातील १८ ते २० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होईल. या वेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी वंचितने प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

सध्या राज्यातील ३० ते ३५ विधानसभा जागा लढवण्यास पोषक आहेत. अन्य जागांबाबत दौऱ्यातील चाचपणीनंतर निर्णय घेतला जाईल. दूध पावडर आयात निर्णया विरोधात राहुरी (जि. अहमदनगर) येथून आंदोलनाची सुरुवात केली जाईल अशी माहिती देण्यात आली.’

... तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही

ऊस दराच्या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत ज्या कारखान्यांनी तीन हजारापेक्षा कमी दर दिला आहे त्यांनी शंभर रुपये प्रतिटन तर ज्या कारखान्यांनी तीन हजारापेक्षा जास्त दर दिला आहे त्यांनी प्रतिटन ५० रुपये ज्यादा भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जवळपास १८० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर कारखान्याची धुराडी पेटू दिली जाणार नसल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत अजून काही शेतकऱ्यांना मिळाली नाही, चंद्रकांत नवघरे यांची माहिती

Nandgaon APMC: नांदगाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

Forest Rights: ताब्यातील जमीन वनपट्टेधारकांना मिळावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे

Pune APMC: परवाने दुसऱ्यांना, मनमानी जागावाटप! पुणे बाजार समितीच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची विधान परिषदेत मागणी

SCROLL FOR NEXT