Raju Shetti vs Jayant Patil agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti vs Jayant Patil : जयंत पाटलांच्या कारखान्यासमोर राजू शेट्टींचे आंदोलन, स्वाभिमानी मागणीवर ठाम

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेकडून मागच्या काही दिवसांपासून एफआरपीनुसार ३३१० रुपयांची मागणी केली आहे.

sandeep Shirguppe

Sangli Sugarcane Strike : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेकडून मागच्या काही दिवसांपासून एफआरपीनुसार ३३१० रुपयांची मागणी केली आहे. तसेच, मागील हंगामातील पन्नास रुपये देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीकडून काल आंदोलन करण्यात आले.

आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव चेअरमन असलेल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यात महेश खराडे, संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते काटा असलेल्या बाजूने गेटच्या आत घुसले. त्यातील काहींनी उसाच्या मोळ्या टाकल्या जाणाऱ्या गव्हाणीत उड्या मारत घोषणाबाजी केली.

पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गेटवरच ठिय्या मारून घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान माजी खासदार राजू शेट्टी हेही घटनास्थळी पोहोचले साडेबाराच्या सुमारास राजू शेट्टी कार्यस्थळावर पोहोचले.

ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेतल्या. माजी खासदार राजू शेट्टी खुर्ची टाकून बसले आणि या कारखान्याचे गाळप बंद पाडण्यात आले. राजाराम कारखान्याच्या कारकिर्दीत तब्बल ९ तास सलग कारखाना बंद पाडण्याची ही पहिलीच वेळ असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

स्वाभिमानीचा प्रस्ताव कारखाना व्यवस्थापनाने अमान्य केल्याने शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन चिघळले. लेखी पत्र मिळाल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा घेतल्याने रात्री आंदोलकांनी कारखान्याच्या वजन काट्यासमोरच मंडप घालून ठिय्या मारत जेवनाची सोय केली. दरम्यान, या आंदोलनाला राजकीय झालर असल्याची टीका कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली.

कारखान्याने निर्णय घेतला असून आपणाला ते तसे पत्र दिले जाईल, असे सांगून पोलिसांनी शेट्टी व त्यांच्या समर्थकांना आंदोलनस्थळी जाऊ न देता थेट बैठकीला नेले. या बैठकीत कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सांगलीत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत '२०२३, २४ साठी पहिली उचल ३१०० मान्य केली आहे.

मात्र, हा अंतिम दर नसल्याचे सांगितले. राजू शेट्टी यांनी त्यांचे म्हणणे धुडकावून लावत तेथून वजन काट्याकडे गाडीतळावर मोर्चा वळवला.

रात्री उशिरा आंदोलन मागे

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले. ७ व ८ डिसेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व प्रशासन यांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farmer Challenges: पांढऱ्या सोन्याची शोकांतिका

Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली

Pune Water Circulation: नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन

Job Recruitment Policy: नोकरी देताना भरती नियमांचे पालन आवश्‍यक

Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दर वाढ स्थगित

SCROLL FOR NEXT