Sugarcane Rate Sangli Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate Sangli : जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यामुळे १६ साखर कारखानदार वेठीस, राजू शेट्टींची जोरदार टीका

Sangli Sugarcane Issue : दत्त इंडियाने स्वतंत्रपणे ऊस दर जाहीर करावा. जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहे.

sandeep Shirguppe

अभिजीत डाके

Sugarcane Price Sangli : सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न पेटला आहे. जयंत पाटील आणि विश्वजीत कदम या दोघांचा अहंकारमध्ये येत असून सोळा कारखान्यांना वेठीस धरले जात आहे.

जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी 'दत्त इंडिया'च्या प्रशासनावर दबाव टाकला आहे. जिल्ह्यात राजकीय दादागिरी सुरू असून ही दादागिरी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी दैनिक ॲग्रोवनशी बोलताना म्हणाले, २२ तास झाले धरणे आंदोलन सुरू आहे. दत्त इंडिया कोल्हापूर पॅटर्न प्रमाणेच ऊस दराची घोषणा करण्यासाठी तयार आहे.

शासनाने आम्हाला कोल्हापूर पॅटर्न प्रमाणेच ऊस दर जाहीर करा असे सांगावे आम्ही दर जाहीर करतो. मात्र कारखाना प्रशासनावर दोन दिवसापासून राजकीय दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीच भूमिका स्पष्ट केली जात नाही.

ते पुढे म्हणाले कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर करावी अशी आमची भूमिका आजही कायम आहे. जिल्हाधिकारी हे सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी शासनाची पंचगिरी करायची आहे. दत्त इंडियाने स्वतंत्रपणे ऊस दर जाहीर करावा. जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहे.

दादागिरी मोडून काढू

मात्र जयंत पाटील आणि विश्वजीत कदम या दोन नेत्यांचा अहंकार मध्ये येत आहे. या दोघांच्या मुळे जिल्ह्यातील १६ साखर कारखाने वेठीस धरले जात आहे. त्यामुळे यांची दादागिरी वाढू लागली आहे. ही दादागिरी आम्ही मोडून काढू.

२८८ पैकी आमचं कोणीच नाही

मागच्या ४ दिवसांपासून राज्याची उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी पक्ष असो हे दोन्ही आमच्या बाजूने नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी कोणाला वेळ नसल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.

कारखान्याचे गाळप बंद

कारखान्याच्या दोन मिल आहेत. काल गाळप सुरू होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर साडेपाच हजार मे. टन गाळप करण्याची मिल बंद केली. मात्र, कारखान्यात उसाच्या गाड्या होत्या. त्यामुळे. अडीच हजार मे. टन गाळप करणारी मिल सुरू होती, ती रात्री उशिरा बंद झाली. दरम्यान ऊस दराचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कारखाना बंद राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT