National Seed Conference : छत्रपती संभाजीनगरला आजपासून १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद

Climate Change : बदलत्या हवामान स्थितीत नवसंशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने ही परिषदेची संकल्पना आहे.
Seed
Seed Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : भारतीय बियाणे तंत्रज्ञान संस्था, वाराणसी येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन संस्था व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी यांच्यातर्फे सोमवार (ता. ११) ते बुधवार (ता. १३) या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद (नॅशनल सीड काँग्रेस) आयोजित केली आहे.

यानिमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील बियाणे परिषदेचे यजमानपद भूषवीत आहे. ‘ॲग्रोवन’ या परिषदेचे माध्यम सहयोगी आहे.

बदलत्या हवामान स्थितीत नवसंशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने ही परिषदेची संकल्पना आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. या १२ व्या परिषदेसाठी देशभरातील कृषी संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खासगी बियाणे उद्योजक, बीजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

Seed
National Seed Conference : छत्रपती संभाजीनगर येथे १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषद

सोमवारी सकाळी ९ वाजता भारतीय कृषी संशोधन व शिक्षण विभाग माजी सचिव व महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद डॉ. मंगला राय यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

या वेळी पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई एस. पोपरे, केंद्रीय कृषी आयुक्त, डॉ. पी. के. सिंग, पद्मश्री कंवल सिंह चौहान, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अध्यक्ष अजय राणा, भा.कृ.अ.सं. माजी संचालक डॉ. एस. ए. पाटील, महिको ग्रुप अध्यक्ष राजू बारवाले, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था व एएसी अध्यक्ष डॉ. एच.एस. गुप्ता, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर हे उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चासत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञानासंबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा होणार आहे. यामध्ये शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खासगी बियाणे उद्योजक, बीजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शेतकरी, बियाणे उत्पादक व उद्योजक यांच्यासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Seed
Onion Seed Production : जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी होणार

याशिवाय या परिषदेत मंगळवारी भारतीय बीज तंत्रज्ञान संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या अमीर सिंह जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेच्या समारोपप्रसंगी बुधवारी (ता. १३) प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा, कुलगुरू डॉ. इंद्र मणि, डॉ. एच. एस. गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

परिषदेच्या आयोजनासाठी निमंत्रक वनामकृविचे संचालक संशोधन, डॉ. दत्तप्रसाद वासकर आयोजन सचिव कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य या परिषदेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे संचालक विस्तार शिक्षण, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), कुलसचिव, नियंत्रक, विद्यापीठ अभियंता व विद्यापीठातील सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com