Farmer Income Loss: ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढून पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणि मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पॅकेजमधील निम्म्याहून अधिक निधी अद्याप वितरित झालेला नाही. त्यामुळे एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे मदतीचा निधी रखडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कशी फुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे..राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान’च्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना वाजत गाजत सुरू करण्यात आली. या योजनेचे आतापर्यंत आठ हप्ते देण्यात आले आहेत. यापोटी आतापर्यंत १३ हजार ४५७ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. यातील बहुतांश हप्ते निवडणुकांच्या तोंडावर वितरित केले आहेत. पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना १७७४ कोटी रुपयांचा आठवा हप्ता १६ मार्च रोजी वितरित करण्यात आला..त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा प्रस्ताव पाठविताना कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना बंद करावी किंवा कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, अशी शिफारस करण्यात आली. त्यामुळे या योजनेचे एप्रिल ते जुलै आणि आॅगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत देण्यात येणारे दोन हप्ते वितरित करण्यात आलेले नाही..Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर.केंद्र सरकारने २३ हप्ते वितरित केले असून, अंतिम हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानचा हप्ता वितरित करण्यात येतो. त्यासाठी कृषी विभागाने प्रस्ताव तयार केला असला, तरी निधी नसल्याने तो थंड बस्त्यात ठेवला आहे..प्रोत्साहन योजना पुढील वर्षातपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने जाहीर करताना २०२२ पासून २०२५ पर्यंत उचल केलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड केली असेल तर त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ समझोता योजना (ओटीएस) लागू करण्यात आली आहे. त्यासाठी मुदतही दिली आहे. प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी सर्व डाटा उपलब्ध असूनही निधीअभावी सरकार चालढकल करत आहे..कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात सहकार विभागाने ३२ लाख शेतकऱ्यांची पडताळणी केली आहे. यापैकी १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर या यादीतील शेतकऱ्यांना लाभ देणे सुरू आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या मनमानीमुळे तब्बल १३ लाख खाती सदोष आहेत. यातील व्याज आकारणी चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे ती यादी पुन्हा बँकांकडे पाठविण्यात आली आहे..Drought Management: दुष्काळावर रोजगाराच्या हमीचा उतारा.राष्ट्रीयीकृत बँकांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली असताना या बँकांना कोणत्याही पद्धतीने विचारणा करण्यात आली नाही. प्रथम यादी घेऊ आणि नंतर कारवाई करू, अशी बोटचेपी भूमिका सरकारने घेतल्याने अद्याप ही यादी आलेली नाही..दरम्यान, थकीत कर्जमाफीचे पैसे वितरित करण्यास विलंब होत असल्याने आणि वित्त अर्थसंकल्पी अधिवेशनात केवळ २० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने हिवाळी अधिवेशनातच प्रोत्साहन योजनेसाठी निधीची तरतूद करावी लागणार आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे आणि वित्तीय तुटीमुळे एरवी ज्याप्रकारे भरमसाट पुरवणी मागण्या मान्य केल्या जात होत्या, त्यावर या वेळी मर्यादा येणार आहे. परिणामी, प्रोत्साहन योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील वर्षातच लाभ मिळण्याची शक्यता आहे..पॅकेज ३१ हजार कोटींचे; प्रत्यक्ष १८ हजार कोटी वितरितमागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजविला होता. त्यामुळे राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यापैकी १८ हजार कोटी रुपयांचे वितरण झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. तसेच विहिरींची दुरुस्ती, खरवडून गेलेल्या जमिनींचे पुनर्भरण याची जबाबदारी रोजगार हमी योजना विभागाकडे देण्यात आली होती. यात नापीक जमिनींच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी २ लाख ९८ हजार रुपयांचे अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र त्यासाठी निधी वितरित केलेला एकही शासन आदेश काढण्यात आलेला नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.