Raju Shetti vs Eknath Shinde agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर, राजू शेट्टींचा घाणाघात

Raju Shetti : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर झाल्याची खरमरीत टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर झाल्याची खरमरीत टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये 17 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावरून राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. राज्याचे साखर धोरण ठरवण्यासाठी बैठक बोलवली असली, तरी या बैठकीला काहीच अर्थ नसल्याचे शेट्टी म्हणाले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये ते म्हणाले की, साखर कारखानदारांकडे साखरेचा चढलेला भाव इथेनॉलमधून मिळालेला पैसा याचा विचार करता साडेचार हजार कोटी शिल्लक असताना आम्ही चारशे रुपयेची मागणी करत आहे, मात्र कारखानदार द्यायला तयार नाहीत, साखर सम्राटांसमोर देवेंद्र फडणवीसांचं काहीही चालत नाही तर एकनाथ शिंदे हे साखरसम्राटांच्या ताटाखालचे मांजर असल्याची जोरदार टीका शेट्टी यांनी केली.

रेव्ह्यून्यू शेअरींग फॉर्म्युला (आरएसएफ) साखर कारखानदारांनी सोयीने वापर करून घेत असल्याने ही फसवाफसवी आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळा पटवून सांगूनही त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच साखर कारखानदारासंमोर काही चालत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना आम्ही जनतेची नाळ ओळखणारे समजत होतो. मात्र, ते साखर सम्राटांच्या ताटाखालील मांजर झाले आहेत. एकरकमी एफआरपी देण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शासन निर्णय होण्यासाठी त्यांच्याकडे अनेकवेळा उंबरे झिजवले. मात्र, तो निर्णय साखर सम्राटांच्या दबावामुळे होऊ शकला नाही.

त्यामुळे साखर कारखानदारांसोबतच्या बैठकीत साखर कारखानदार म्हणतात बैठक झाली, मात्र शासन निर्णय कोठे झाला? त्यामुळे धोरण काही असलं तरी अजित पवारांच्या मनात असेल, साखर कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचे धोरण असेल हे मला माहित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, फडवणीस फक्त म म म्हणण्याचं काम करणार आहेत. त्या बैठकीतून काहीही साध्य होणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kerala Assmbly : व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा योजना लागू करा; केरळ विधानसभेत ठराव मंजूर

Post Harvest Value Addition: कर्नाटकात भात पीक काढणीपश्चात मूल्यवर्धनाचं मॉडेल, चार-पाच पट अधिक उत्पन्नाची हमी

Rural Governance: गावगाड्याचा विकास कधीपर्यंत वाऱ्यावर?

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

SCROLL FOR NEXT