Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : राजू शेट्टींची पदयात्रा स्थगित, मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा, मनोज जरांगेंची घेणार भेट

Raju Shetti Akrosh Padyatra : माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही पदयात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा त्यांनी दिला.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate : मागील हंगामातील ऊस गाळपाचे प्रतिटन ४०० रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी साखरकारखानदारांच्या दारात पायी जाऊन २२ दिवस आक्रोश पदयात्रा काढत आहेत. दरम्यान ही पदयात्रा सांगली जिल्ह्यात जाऊन पोहोचली आहे. आज (ता.३०) १४ व्या दिवशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही पदयात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देत त्यांनी ही या तात्पूर्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर ते तातडीने मनोज जरांगेंच्या भेटीलाही जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गळीत हंगाम २०२२ -२३ च्या ऊसाला ४०० रु दुसरा हप्ता मिळावा व वजन काटे ऑनलाईन व्हावेत या मागणीसाठी २२ आक्टोबर ते ७ नोव्हेंबर अखेर चालू असलेली आक्रोश पदयात्रा १४ व्या दिवशी आज सांगली जिल्ह्यातील करमाळे या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषनाचा आज ५ वा दिवस आहे यामध्ये जरांगे पाटील यांची तब्बेत खूपच खालावली आहे. आपल्या सारखाच एक कार्यकर्ता मराठा आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करीत आहे.

असे असताना आपण हार, गुच्छ व फुलांचे हार गळ्यात घेणे मनाला पटले नाही म्हणून, आजपासून पदयात्रेला स्थगिती देवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथील शासकिय अतिथी गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही साखर कारखाने सुरु करु नये व कारखान्यातून साखर बाहेर सोडू नये असे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना शेट्टी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT