Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : राजू शेट्टींनी हसन मुश्रीफांचे चँलेंज स्विकारलं, जिल्हा बँकेकडे पत्राद्वारे केली मागणी

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना साखर विक्रीबाबत वक्तव्य केले होते.

sandeep Shirguppe

Hasan Mushrif VS Raju Shetti : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना साखर विक्रीबाबत वक्तव्य केले होते. मंत्री मुश्रीफ यांनी साखर कारखान कर्जात आहेत तुम्ही मागणी केलेला दर कारखानदारांना देणे परवडत नसल्याचे म्हणत जिल्हा बँकेत तुमचा सीए पाठवून द्या आम्ही हिशोब सांगतो असे मुश्रीफ म्हणाले होते.

यावर माजी खासदार शेट्टी यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ अखेर दर पंधरवड्याला केलेल्या साखर विक्रीची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मागितली आहे. बँकेने जिल्ह्यासह सोलापूर, सांगली व सीमाभागातील चौदा कारखान्यांना साखर तारणावर अर्थ पुरवठा केला आहे. साखर विक्रीचा दर मागवून शेट्टी यांनी कारखानदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील हंगामातील उसाला प्रतिटन चारशे रुपये मिळावे, यासाठी राजू शेट्टी त्यांनी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा काढू नये, त्यांनी आपला 'सीए' पाठवून द्यावा, त्यांना हिशेब दाखवला जाईल. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते. यावर शेट्टी यांनी हे आव्हान स्विकारत जिल्हा बँकेला पत्र दिले आहे.

मात्र, शेट्टी यांनी थेट जिल्हा बँकेकडे साखर विक्री व दराची माहिती मागितली आहे. कारखानानिहाय प्रत्ये महिन्याला साखर विक्री व दर या माहिती द्यावी, असे पत्रच बँके दिले आहे.

कारखान्यांची साखर दरात मखलाशी: राजू शेट्टी साखर कारखान्यांनी एकूण साखर विक्री पैकी ७० टक्के विक्रीचा दर प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांनी असल्याचे ताळेबंदाला दाखवले आहे. प्रत्यक्ष बाजारातील दर पाहता कारखान्यांनी घोळ केल्याचे उघड होते.

यासाठी जिल्हा बँकेकडे तारण असलेली साखर कारखान्यानी किती दराने विक्री केली, याची माहिती मागितली आहे. ती आल्यानंतर शेतकऱ्यांना ४०० रुपये कसे देता येतात, हे कारखानदाराना दाखवून देऊ, असे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यानी सांगितले.

'बिद्री, भोगावती', 'कुभी', राजाराम', 'डी. वाय. पाटील', 'आजरा, 'हमीदवाडा, संताजी घोरपडे, उदयसिंगराव गायकवाड', 'इंदिरा-तांबाळे', "इको म्हाळुगे' याशिवाय परजिल्ह्यातील कारखाने जिल्हा बँकेकडून कर्ज घेतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT