Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth Mahamarg agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Mahamarg : आचारसंहिता संपताच शक्तिपीठ विरोधात रस्त्यावरच्या लढाईस तयार रहा : राजू शेट्टी

sandeep Shirguppe

Raju Shetti Shaktipeeth Highway : वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकजूट करून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केले आहे.

शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली. शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे, प्रकाश पोफळे (नांदेड), हणमंत पाटील (यवतमाळ), श्रीनिवास भोसले (बीड), रवी इंगळे (धाराशिव), तानाजी बागल (सोलापूर), धर्मराज पाटील (लातूर), किशोर ढगे (परभणी) आदींसह शेतकऱ्यांनी शिरोळ येथे येऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करावा, अशी मागणी केली.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकजूट करून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलन करावे. शेतकऱ्यांच्या जमिनींवर वरवंटा फिरविणारा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने मंजूर केल्याने २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

हजारो अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. यामुळे हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींच्या सुनावणीकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असून, मी लोकसभेचा उमेदवार आहे. म्हणून मी सध्या कोणत्याही आंदोलनात उतरू शकणार नाही, पण, आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांसाठी मी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहे, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार बहुतांश बागायती क्षेत्रातून तो जाणार आहे. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षाच्या कष्टाने फुलविलेल्या बागायती महामार्गासाठी घेतल्या जाणार आहेत. मात्र, भूसंपादनाच्या भरपाईविषयी अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. नव्या कायदेशीर तरतुदीनुसार मूल्यांकनाचे दर शासनाने कमी केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याऱ्यांना पुरेसे पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Session 2024 : शेतमालाच्या हमीभाव कायद्यावरून संसदेत गोंधळ; राहुल गांधी आणि कृषिमंत्र्यांमध्ये खडाजंगी

Animal Care : जनावरांचे आरोग्य, आहार व्यवस्थापन

Organic Paddy Farming : सेंद्रिय भातशेतीसह देशी गोपालन, कुक्कुटपालन

Kolhapur Rain : शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडामध्ये मुसळधार, राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत १ फुटाने वाढ

Vegetable Farming : प्रत्येकी ३० गुंठे भाजीपाला उत्पादनातून मिळविले स्थैर्य

SCROLL FOR NEXT