Ahilyanagar News : निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलसचिवपदावर नियुक्ती झाली आहे. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची अहिल्यानगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे येथे महाव्यवस्थापकपदी पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांना पुणे येथे माहिती व जनसंपर्क कार्यालयात उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
अहिल्यानगरला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खासगी सचिव म्हणून जानेवारी २०२५ मध्ये नियुक्ती झाल्यापासून अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे अहिल्यानगरचा अतिरिक्त पदभार होता.
या पदावर हिंगे यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची पदोन्नती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव पदावर झाली आहे. बियाणे विभाग प्रमुख नितीन दानवले यांच्याकडे कुलसचिव पदाचा अतिरिक्त पदाचा पदभार होता. राजेंद्रकुमार पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
ऑगस्ट २०१४ ते जून २०१७ आणि ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२५ या कालावधीत अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे येथे महाव्यवस्थापक पदावर झाली आहे.
पाटील यांनी एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२५ या दोन वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या. जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांना पुणे विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक पदावर पदोन्नती झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.