Bullock Cart Agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart : हौशेला मोल नाहीच; पुण्यातील खेडच्या शेतकऱ्याने घेतला तब्बल २१ लाखांला बैल

Bullock Cart Race : आपल्याकडे हौशेला मोल पाहिले जात नाही. एखादी गोष्ट आवडली तर त्यासाठी लाखो रूपये मोजणारे अनेक आहेत. असेच लाखो रूपये पुण्यातील खेडच्या शेतकऱ्याने एका बैलासाठी मोजलेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे आपल्या हौशे खातर लाखो रूपये मोजायला तयार असतात. अशाच एका हौशेची आणि हौस भागवणाऱ्या शेतकऱ्याची चर्चा पुण्यातील खेड परिसरात सध्या होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी आपल्या हौशे खातर तब्बल २१ लाखांना बैल खरेदी केला आहे. तर या बैलाचे नाव ‘किटली’ असून याची किंमत एखाद्या आलिशान कार इतकी असल्याने बैलाला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे.

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अनेक ठिकाणी मोठ मोठ्या शर्यतींचे आयोजन होत आहे. त्यामुळे अनेक लोक चांगल्या आणि जातीवंत बैलाची निवड करतात. बैलांसाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी दाखवतात. यामुळे सध्या राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी लागणार्या बैलांना चांगली मागणी आहे. तर हौशेसाठी कोणतीही किंमत शेतकरी मोजत आहेत.

पुण्याच्या खेड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी देखील आपल्या बैलगाडा शर्यतीच्या हौशेसाठी किटली नावाच्या बैलाची खरेदी केली आहे. पाचारणे यांनी या बैलासाठी तब्बल २१ लाख रूपये मोजले आहेत.

तसेच पाचारणे यांनी या बैलाला घरी आणत त्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यामुळे पंचक्रोशीत सध्या किटली नावाच्या बैलाची आणि त्याच्या किंमतीची जोरदार चर्चा रंगली आहे. तर किटलीला पाहण्यासाठी पंचक्रोशितील शेकडो लोक पाचारणे यांच्या घराकडे जात आहेत.

बाजारात लाखोंची उलाढाल

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर जनावरांच्या बाजाराला चांगेल दिवस आले आहेत. विविध जिल्ह्यात होणार्या बैलगाडा शर्यतीसाठी आता बैलांची खरेदी-विक्री सुरू झाली असून पुन्हा एकदा लाखोरुपयांची उलाढाल होत आहे. यादरम्यान पाचारनेवाडी येथील शेतकऱ्याने २१ लाखांचा बैल घेतल्याने राज्यात याची चर्चा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT