Bullock cart race : बैलाने शर्यत मारताच मिळणार मालकास चक्क १ BHK फ्लॅट; कोठे होतेय 'ही' बैलगाडा शर्यत?

Kasegaon Bullock cart race | राज्यासह देशात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा थरार पहायला मिळतो. जसा थरार हा बैलगाडा शर्यतीचा असतो तसेच वैशिष्ट्य हे बक्षिसाबाबत असेत. आतापर्यंत यात ट्रॅक्टर, मोटारसायकल आणि रोख रक्कम दिली जायची पण आता चक्क १ BHK फ्लॅट देण्याची घोषणा एका बैलगाडा शर्यतीसाठी झाली आहे. यामुळे याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
Bullock cart race
Bullock cart raceAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचे प्रचंड वेढ आजही पाहायला मिळते. पण केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० चा आधार बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ती सुप्रीम कोर्टा २०२१ मध्ये उठवली. यामुळे राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

यानंतर आताही राज्यातील विविध भागात मोठ मोठ्या बैलगाडी शर्यती भरविण्यात येतात. यासाठी बक्षीसांची लयलूट करण्यात येते. ज्यात थार गाडी, ट्रॅक्टर, मोटारसायकल आणि रोख रक्कमेचा समावेश असतो. पण यंदा यात १ BHK फ्लॅट भर पडली आहे. यामुळे ही बैलगाडा शर्यत कोठे होणार? बक्षीस कोण देणार आणि कोणी ही शर्यत ठेवली आहे असे एक ना अनेक प्रश्नांवर लोक चर्चा करताना दिसत आहेत.

Bullock cart race
Women Bullock Cart Race : भिर्रर्रर्र... शंकरपटातही महिलांची मक्तेदारी

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही बैलगाडा शर्यतीचा बाज पाहायला मिळतो. बंदी उठवल्यानंतर आता गाव-गाव पातळीवर बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. कोण्या हौसी तर सध्या राजकारण्यांनी यात हात घातला आहे.

राजकारण्यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर आता बैलगाडा शर्यतींचे आयोजन होत आहे. ज्यातून बैलगाडा मालकांना मोठ्या रक्कमेसह शौकीनांचे मनोरजंन देखील होत आहे. तसेच बैलगाडा शर्यतीबरोबरच लाखोंचे बक्षीसांची यादी पाहायला मिळते.

Bullock cart race
Bullock Cart Race : तळेगाव- बैलगाडा शर्यतीत त्याचे नाव महिलांचा सहभाग हे मुख्य आकर्षण

१ बीएचके फ्लॅट आणि लाखोंचे बक्षीस

यावेळी एका शर्यतीत १ बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ७ आणि ५ लाख रुपये देण्यात येणार आहे.

तसेच हे बक्षीसं सांगलीच्या कासेगावमधील जयंत केसरी बैलगाडा शर्यतीमधील देण्यात येणार आहेत. तर ही शर्यत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे. तसेच ती कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

लाखोंचे बक्षीस लाखोंची गर्दी

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी १ बीएचके फ्लॅटसह लाखोंचे बक्षीसांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेशमधून २०० हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होतील असे बोलले जात आहे. तर ही शर्यत १० एकरावर होणार असून किमान १ लाख बैलगाडा शर्यत शौकिनांची बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अतुल लाहीगडे (शरद फाऊंडेशन) यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com