Rajaram Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sugar Factory : राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेपूर्वीच विरोधक आक्रमक, 'सभासदांना अपेक्षित सहकार्य नाही'

Rajaram Sugar Factory Kolhapur : यावर्षी मोठ्या प्रमाणावर पूर येऊन गेला आहे. पूरबाधित क्षेत्रातील उसाची तोडणी प्राधान्याने करावी. प्राधान्यक्रमानुसारच ऊस तोडण्या द्याव्यात.

sandeep Shirguppe

Amal Mahadik VS Satej Patil : पुरात बुडालेल्या उसाला यावर्षी तातडीने तोडणी द्यावी, यासाठी आतापासून नियोजन करावे. वारसा हक्काचे सभासद तत्काळ मिळावे, मयत सभासदांच्या वारसांनाही साखर मिळावी, अशी मागणी करून कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडून १७ हजार ‘अ’ वर्ग सभासदांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या आरोप राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीने केला. कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांना याबाबतचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याचे सुमारे १७ हजार ‘अ वर्ग सभासद’ आहेत. त्यांना कारखाना प्रशासनाकडून सहकार्य केले जात नाही. याची वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून व निवेदने देऊन समक्ष चर्चा केली आहे. तरीही काही प्रश्‍नांबाबत आपल्याकडून प्रत्येकवेळी फक्त मोघम स्वरुपात उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. हा प्रकार सात ते आठ वर्षे सुरू आहे. कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी सुमारे ३५०० ते ४००० सभासद मयत आहेत.

या मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या वारसांच्या नावावर करावेत. यामध्ये राजकारण करू नये. कारखान्याकडून अ वर्ग सभासदांना प्रति महिना ६ किलो साखर सवलतीच्या दरात दिली जाते. आतापर्यंत कारखान्याचे जे सभासद मयत झाले आहेत. त्यांनाही साखर दिली जात होती. एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीपर्यंत ही साखर दिली होती. मात्र, निवडणूक झाल्यानंतर ही साखर बंद केली आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणावर पूर येऊन गेला आहे. पूरबाधित क्षेत्रातील उसाची तोडणी प्राधान्याने करावी. प्राधान्यक्रमानुसारच ऊस तोडण्या द्याव्यात. यामध्ये कोणतेही राजकारण करू नये. यावेळी, मोहन सालपे, दिनकर पाटील, डी. बी. पाटील उपस्थित होते.

यंदाची वार्षीक सर्वसाधारण सभा गाजणार

राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाने सत्ता कायम ठेवल्याने विरोधी सतेज पाटील गटाकडून वार्षीक सर्वसाधारण सभेत अनेक मुद्दांवरून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान परिवर्तन आघाडीकडून कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांना निवेदन दिल्याने याच मुद्दांवरून सभा गाजू शकते. तसेच मागच्या काही महिन्यांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना मारहाण झाल्याने महाडिक गटाकडून कसे उत्तर दिले जाते यावर ही सभा अवलंबून राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट

Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

SCROLL FOR NEXT