Raj Thackeray MNS Melava Agrowon
ॲग्रो विशेष

Raj Thackeray : 'ना युती, ना आघाडी' राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी थोपाटले दंड; पैसे घ्या, पण मतदान मनसेलाच करा, जनतेला आवाहन

Raj Thackeray MNS Melava : मनसेच्या मेळाव्यातून रविवारी (ता.१३) राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये रविवारी (ता. १३) महाराष्ट्र नव निर्माण कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना आणि विषयांना हात घालताना राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना पैसे नको तर चांगले धोरण हवं आहे. यासाठी आता 'ना युती, ना आघाडी' अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.

लाडक्या बहिणांना फुकट काही नको

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून लाडक्या बहिण योजनेमुळे जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील असा दावा केला. तसेच महिला, शेतकरी आणि युवक काही फुटक मागत नसून ते काम मागत आहेत. महिलांच्या हाताला काम दिल्यास कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा. त्यांना योग्य मार्ग दाखवा. तर आमचा शेतकरी फुकट वीज मागत नसून तो म्हणतो वीजेत सातत्य मागत आहे. कमी पैश्यात द्या. पण वीज तर द्या असे आवाहन केले आहे. तर राज्यातील जनतेला फुकट देण्याच्या सवयी लावल्या तर राज्य राहणार नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शरद पवार पंतप्रधान मोदींवर टीका

मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी, राज्यात सध्या गद्दारी सुरू असून सध्या फोडाफोडी फोडीचे राजकारण सुरू असल्याची टीका केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना, शरद पवार आज आपला पक्ष फोडला म्हणून ओरडत आहेत. मात्र त्यांनीच काँग्रेस, शिवसेना फोडली असा आरोप केला. १९७८ ला काँग्रेस फोडली. १९९१ला शिवसेना फोडली. ज्या अजित पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. त्यांना जेलमध्ये टाकू असे बोलले त्यांनाच त्यांनी गुलाबी जॅकेट घालून आपल्याबरोबर सत्तेत घेतले. हे फक्त राज्यातील जनतेला गृहीत धरून केलं जात आहे.

गड किल्यांवर खर्च करा

यावेळी राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राज ठाकरे यांनी, समुद्रात पुतळा उभारण्या ऐवजी त्यावर खर्च होणारे १५ ते २० हजार कोटी रूपये गडकिल्ल्यांवर खर्च करा, असे आवाहन केले. तर असा खर्च केल्यास किमान आपला राजा कोण होता, हे जगाला सांगता येईल, असा टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाना

या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नसून सारखं वाघं नखं काढत आहेत. महाराष्ट्राबद्दल कधी बोलणार असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला आहे. पुष्पा असे एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना, फक्त दाडीवरून हात फिरवतात, असा टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे आपण असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही. आपण कुणामुळे निवडून आलात आणी सध्या काय करत आहात? अशी विचारधारा पाहिले नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

ना युत्या, ना आघाड्या : राज ठाकरे

यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूका कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तर यावेळी स्वबळाचा नारा देताना या निवडणुकीत ना युत्या, ना आघाड्या अशी घोषणा केली आहे. तसेच निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील गुन्हेगारची आकडेवारी सांगत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात गेल्यावर्षी ९ हजाराच्यावर मुली पळवल्या गेल्या असून आता राज्यात गुन्हे वाढल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या पीकविमा भरपाईचा निकाल लागेना

Onion Market : सोलापुरात कांदा खरेदीदार व्यापाऱ्याला आठ लाखांचा दंड

Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

SCROLL FOR NEXT