Koyna Dam Water Decrease : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा आज (ता.३०) मंगळवारी सकाळी आठ वाजता ८५.३७ टीएमसी झाला आहे. सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या ३० हजार क्यूसेक विसर्ग विसर्गात वाढ करून तो आज मंगळवारी दुपारी बारा वाजता ४० हजार क्यूसेक करण्यात येणार आहे त्यामुळे कृष्णा कोयना नदीकाठी पुन्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. मागील आठवड्यात दररोज सरासरी चार ते पाच टीएमसी पाण्याची आवक होत होती. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूटाने उचलून कोयना नदी पात्रात धरणाच्या सांडव्यावरून १० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती.
मात्र पाण्याची आवक जलाशयात प्रति सेकंद ८५ हजार क्युसेक्स पेक्षा जास्त होत होती. त्यामुळे दोन तासातच धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. धरणात होणारी पाण्याची आवक आणि धरणाचा एकूण पाणीसाठा याचा ताळमेळ बसत नव्हता त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाचे दरवाजे सहा फुटांवर नेऊन कोयना नदीत ३० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला गेला.
सांडव्यावरुन ३० आणि पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक असा ३२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येत होता तो विसर्ग गेले तीन दिवस कायम ठेवण्यात आला होता. काल सोमवारी रात्रीपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडासा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे.
कोयनेचा विसर्ग वाढणार
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून ४० हजार वीस क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता धरणात ८५.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात ३५ हजार ४०१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला १०७, नवजा ९९ तर महाबळेश्वरला १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून आज मंगळवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात येणारे ४० हजार कयूसेक व पायथा वीज ग्रहातून सोडण्यात आलेले दोन हजार १०० कयूसेक असा ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.