Rain Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Onion and Grapes Damage : पावसाने कांदा, द्राक्षाला मोठा फटका

Rain Update : मागील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच गुरुवारी (ता.५) रोजी संध्याकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत झालेल्या पावसाने दणका दिला.

मुकूंद पिंगळे

Nashik News : मागील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच गुरुवारी (ता.५) रोजी संध्याकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत झालेल्या पावसाने दणका दिला. यामध्ये सिन्नर, येवला, नाशिक व निफाड तालुक्यांत कांदा व द्राक्ष बागांमध्ये नुकसान वाढते आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बुधवारी (ता.४) मध्यरात्रीनंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात होऊन अनपेक्षित दणका दिला. पुन्हा गुरुवारी (ता.५) रात्री ८.३० च्या नंतर अनेक भागांत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची झोप उडाली. यात कांदा, द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे.

सिन्नर तालुक्यात नायगाव महसूल मंडलात पहाटे पावसाने दाणादाण उडवली. तर, पूर्व भागातील वावी, पांगरी, शहा, नांदूर, सिन्नर, गोंदे या महसूल मंडलांत दोन ते अडीच तास झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीस आलेला खरीप कांदा व उन्हाळ रब्बी कांद्याच्या लागवडी पाण्याखाली गेल्या आहेत.

येवला तालुक्यात कमी-अधिक पाऊस दिसून आला. त्यामध्ये शहराच्या जवळच असलेल्या बदापूर परिसरात झालेल्या पावसामुळे कांदा लागवडीमध्ये पाणी तुंबले, तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाफे फुटल्याने शिवारात पाणी वाहिले.

निफाड तालुक्यातही पावसाचा जोर दिसून आला. विंचूर, नांदूर, देवगाव महसूल मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. यात कांदा लागवडी रोपवाटिका खराब झाल्या. यामुळे फुलोरा अवस्थेतील, तर कुठे दोडा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचे नुकसान दिसून येत आहे.

नांदगाव तालुक्यात जातेगाव महसूल मंडलात, मालेगाव दाभाडी, वडनेर, सौंदाणे, अजंग, सायने महसूल मंडलांत हलका पाऊस झाला. बागलाण, कळवण व देवळा तालुक्यांतील सर्वच मागत हलका ते माध्यम पाऊस होता. मात्र सटाणा तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्ष बागा काढणीसाठी असल्याने येथील द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती कायम आहे.

नाशिक शहरात जोरदार पाऊस

नाशिक शहर व परिसरात रात्री ८.३० वाजल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत होते. तर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाल्याचे पाहायला मिळाले.

- नव्याने लागवड केलेल्या मका, उन्हाळ कांदा लागवडी पाण्याखाली.

- काढणी करून ठेवलेला तसेच शेतातील काढणीयोग्य खरीप लाल कांद्याचे पावसामुळे नुकसान.

- हस्त बहरातील डाळिंब, हिवाळी बहारातील शेवगा फुलोऱ्याची गळ.

- पावसाचा सलग दुसऱ्यांदा रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिकांना फटका, रोपे पिवळी पडण्यास सुरुवात.

- अचानक आणलेल्या पावसाने जनावरांचा चारा भिजून खराब.

- पेरणी झालेल्या गहू, हरभरा पिकांच्या उगवणीवर परिणाम

- अनेक ठिकाणी वीटभट्ट्यांचे नुकसान

द्राक्षमण्यात पाणी उतरलेल्या बागांची संख्या कमी असली तरी जेथे पाणी उतरले तेथे तडे जाण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश बागा फुलोरा अवस्थेत असून गळकूज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पावसाने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.
बाळासाहेब गडाख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT