Heavy Rain Crop Damage : नाशिक जिल्ह्यात पावसाचा दणका

Rain Issue : थंडीचा कडाका वाढल्यानंतर पारा किमान ७ अंशांपर्यंत घसरला होता. अशातच अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन अनपेक्षित पावसाने निफाड, नाशिक, सिन्नर, दिंडोरी, चांदवड तालुक्यांत दणका दिल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : थंडीचा कडाका वाढल्यानंतर पारा किमान ७ अंशांपर्यंत घसरला होता. अशातच अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन अनपेक्षित पावसाने निफाड, नाशिक, सिन्नर, दिंडोरी, चांदवड तालुक्यांत दणका दिल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्हाभरात खरिपाच्या शेवटच्या टप्प्यात मोठे नुकसान झाले होते. यात मका, द्राक्ष, कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले होते. आता रब्बी हंगामातील कामांना गती येत असतानाच दाणादाण उडवली आहे. काढणीस आलेले नवीन खरीप कांदा पीक पावसात भिजले, तर रब्बी कांदा रोपवाटिकांना फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. त्याच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Crop Damage
Rabi Crop Damage : कमी थंडी, कमी पावसामुळे रब्बी पिकांची कसोटी लागणार; पुढच्या तीन महिन्यांत पिकांना फटका बसण्याची शक्यता 

भारतीय हवामान विभागाने ५ व ६ डिसेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. बुधवारी (ता.५) दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र मध्यरात्रीनंतर तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगलेच झोडपले. सप्टेंबर महिन्यात छाटलेल्या बागांमध्ये गळ व कुजीची समस्या होती. आता पुन्हा बागा पावसाच्या तडाख्यात सापडल्याने डाउनी व बुरशीजन्य रोगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

नाशिक शहरासह तालुक्यात मध्यम ते हलका पाऊस होता. अनेक ठिकाणी पाणी शेतात साचल्याने दिसून आले. सिन्नर तालुक्यातील नायगाव महसूल मंडलात सर्वाधिक ५७ मिमी पावसाची नोंद झाली. काढणीस आलेला कांदा भिजला तर रोपांचे नुकसान आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा

तर ओझर, सायखेडा महसूल मंडलांत पावसाने दाणादाण उडाली. या भागांत काढून ठेवलेला खरीप कांदा पावसात भिजला आहे, तर द्राक्ष बागांच्या पीक संरक्षण खर्चात वाढ झाली आहे. तर, उन्हाळ कांदा लागवडी थांबल्या आहेत. चांदवड तालुक्यातील धोडांबे, वडनेर भैरव महसूल मंडल पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची धाकधूक वाढली आहे. मालेगाव तालुक्यातील शेवग्याची बरीच फूलगळ होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. देवळा, सटाणा, कळवण नांदगाव, सुरगाणा, पेठ, इगतपुरी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.

द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती

सध्या सटाणा, चांदवड तालुक्यातील द्राक्ष बागा काढणीच्या अवस्थेत आहेत. तर बहुतांश द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत आहेत. वाढलेला एकरी उत्पादन खर्च त्यात या पावसामुळे पीक संरक्षणात वाढ होत असल्याने द्राक्ष उत्पादकांनी धास्ती घेतली आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. पावसाने रब्बी उन्हाळ कांदा लागवडी थांबल्या आहेत.
गणेश पानसरे, शेतकरी, नायगाव, ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com