Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात यंदा पाऊस मेहेरबान

Monsoon Rain Update : खानदेशात यंदा पाऊसमान चांगले आहे. जूनमध्येही वेळेत पाऊस आला. पेरण्याही वेळेत झाल्या. यात जून व जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पाऊसमान चांगले आहे. जूनमध्येही वेळेत पाऊस आला. पेरण्याही वेळेत झाल्या. यात जून व जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आवर्षणप्रवण भागात पाऊसमान चांगले असल्याने संबंधित भागातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा वाढायला सुरुवात झाली आहे.

पाचोरा, भडगाव, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर, शहादा या भागांतही पाऊसमान बरे आहे. पाचोरा भागातील अग्नावती, एरंडोलातील अंजनी प्रकल्पात जलसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांत मृतसाठा होता. आता उपयुक्तसाठा स्थितीत हे प्रकल्प आले आहेत. पाचोरा, भडगाव भागात जूनमध्ये ११०मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तसेच जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व काही मंडले वगळता चांगला पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्याची पावसातील एकूण सरासरी बऱ्यापैकी राहीली आहे.

खानदेशात सप्टेंबरअखेर अपेक्षित पावसाच्या तुलनेत चांगला पाऊस सध्या दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७६५ मिमी पाऊस पडतो. धुळ्यात ५६५, नंदुरबारात ८५४ मिमी एकूण पाऊस पडतो. यात जूनमध्ये तिन्ही जिल्ह्यांत ११८ मिमीपेक्षा अधिक पाऊस पाऊस झाला आहे.

या महिन्यातही चांगला पाऊस झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांत खानदेशात काही मंडलांचा अपवाद वगळता रोज बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. शेतांमधून पाऊस वाहून निघाला आहे. पेरण्याही पूर्ण होत आल्या आहेत. या आठवड्यात खानदेशात ९५ टक्के पेरणी होईल, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात ८ जुलैअखेर १९८ मिमी, धुळ्यात २१० मिमी व नंदुरबारात २१५ मिमी एकूण पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा सुमारे ३५ मिमी पाऊस अधिकचा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातही अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस दिसत आहे.

नद्यांना प्रवाही पाणी

खानदेशात पाऊसमान बरे असल्याने नद्याही प्रवाही आहेत. त्यात तापी नदीला चांगले प्रवाही पाणी मागील सात ते आठ दिवसांपासून आहे. मागील दोन दिवसांत तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणात पाण्याची चांगली आवक झाली. यामुळे हतनूर धरणाचे १० दरवाजे सोमवारी (ता. ८) उघडण्यात आले. तापी नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीवरील शेळगाव, धुळ्यातील सुलवाडे, नंदुरबारातील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीसही प्रवाही पाणी आले होते. तसेच अन्य भागातील लहान नाले, नद्यांनाही प्रवाही पाणी आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT